November 16, 2026 1:40 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » ताज्या » न्हावीच्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू !

न्हावीच्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू !

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील न्हावी येथील मित्रांसोबत पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेला तरुण अंघोळीसाठी चंद्रभागा नदीत उतरले. यावेळी त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दर्पण निलेश कोलते (वय १८, रा. न्हावी, ता. यावल) या तरुणाचा बुडून दुर्देवी मृत्यू झत्तला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. आठ तासानंतर तरुणाचा मृतदेह मिळून आला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील न्हावी येथील दर्पण कोलते हा त्याचा मित्र मनोज रघुनाथ कापडे हे दोघे मित्र पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेले होते. रविवारी सकाळी ते दोघे स्नानासाठी चंद्रभागा नदीवर गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे बुडू लागले. हा प्रकार तेथील काही भाविकांच्या लक्षात येताच त्यांनी तरुणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी नदीपात्रात बुडणाऱ्या मनोज कापडे बाहेर काढून त्याला वाचविण्यात यश आले. मात्र दर्पण हा काही वेळातच पाण्यात बुडून बेपत्ता झाला. याबाबतची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली पोलीस प्रशासन व बचाव पथक दाखल झाले. त्यांच्याकडून बुडालेल्या तरूणाचा शोधकार्ययाला सुरुवात झाली.

पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या दर्पण कोलते याचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु झाले. मात्र शोध घेवूनही त्याचा मृतदेह मिळून येत नव्हता. सुमारे आठ तासानंतर दर्पणचा मृतदेह मिळून आला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!