November 15, 2026 12:42 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » ताज्या » जंगलात आढळला महिलेचा संशयास्पद स्थितीत कुजलेला मृतदेह !

जंगलात आढळला महिलेचा संशयास्पद स्थितीत कुजलेला मृतदेह !

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम भागातील गाड्या जामन्याच्या जंगलात ३० ते ४० वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आला. या महिलेचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्यामुळे खळबळ माजून गेली आहे. तसेच महिलेसोबत घातपात झाल्याचा संशय देखील पोलिसांकडून व्यक्त केला जात असून त्यादिशेने तपास केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतावरील अतिदुर्गम भाग असलेल्या गाडऱ्या जामन्या भागात कोरड्या तलाव आहे. या क्षेत्रातून वन विभागाचे कर्मचारी जात असतांना त्यांना तलावात एका अनोळखी महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सोमवारी दुपारच्या सुमारास पथकाला दिसून आला. त्यांनी या घटनेची माहिती यावल पोलीस ठाण्याला दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर हे पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह आढळेली महिला ही ३० ते ४० वयोगटातील असून तीचा मृतदेह पुर्णपणे कुजलेला आहे. त्यामुळे या महिलेचा मृत्यु कशामुळे झाला याची माहिती अद्यापर्यंत समोर आलेली नाही.

महिलेचा मृतदेह घनादाट जंगातील तलावात संशयास्पदरित्या आढळून आला. त्यामुळे महिलेसोबत घातपात झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला. त्या महिलेचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेत यावलहून जळगाव येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!