धक्कादायक : इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला : ३० बुडाले तर ६ पर्यटकांचा मृत्यू ?

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी होती, अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि आपदा मित्र यांनी घटनास्थळी धाव […]
नात्याला काळिमा : ४० वर्षीय बापाने १४ वर्षीय मुलीवर केला बलात्कार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना घडत असतान आता शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे तुळजापूरहून उदरनिर्वाहासाठी आलेल्या 40 वर्षीय नराधम बापाने स्वतःच्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर ही गोष्ट कोणाला सांगू नये, यासाठी त्या नराधमाने पत्नी आणि मुलीला जिवे मारण्याची धमकी देखील दिल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळजापूरहून […]
ट्रक व चारचाकीचा भीषण अपघात : चिमुरडी ठार तर आठ जखमी !

नाशिक : वृत्तसंस्था हजहून येणाऱ्या तरुणीला घेण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघात मालेगाव येथील अकरावर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला, तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी (दि. १४) सकाळी १० च्या सुमारास चांदवडजवळील मंगरूळ टोल नाक्याजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील फतेह मैदान भागातील नऊजण हजहून […]
…तसे वागायला आम्ही तयार आहोत,; आदित्य ठाकरेंचे सूचक विधान !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असून मात्र याच दरम्यान, मनसेचे राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. यावर शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ‘कोण कुणाला भेटतंय, काय बोलतंय, ते माहित नाही. परंतु, आमचे […]
गौरीकुंडच्या जंगलात हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह 7 प्रवासी ठार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था केदारनाथ धामहून गुप्तकाशीला जाणारे आर्यन एव्हिएशनचे हेलिकॉप्टर गौरीकुंडच्या जंगलात कोसळले आहे. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह 7 प्रवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, हे हेलिकॉप्टर केदारनाथ धाम येथील प्रवाशांना घेऊन गुप्तकाशीला परतत होते. बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ०५:१७ वाजता आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टर केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशीसाठी ६ भाविक आणि पायलटसह उड्डाण […]
जळगावात पोलिसांशी हुज्जत घालणे तरुणाना भोवले : अखेर गुन्हा दाखल !

जळगाव : प्रतिनिधी रात्रीच्यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या तरुणांची चौकशी केली. परंतू ते तरुण पोलिसांसोबत अरेरावीच्या भाषेत बोलत असल्याचा प्रकार दि. १२ रोजी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरात घडला. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी सफौ प्रणीत रणित, पोहेकॉ चंद्रकांत […]
मंत्री संजय राठोड दोन दिवसीय जळगाव जिल्हा दौऱ्यावर !

जळगाव : प्रतिनिधी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री श्री. संजय राठोड यांचा जळगाव जिल्हा दौरा रविवार, 15 जून व सोमवार, 16 जून रोजी होणार आहे. तो दौरा पुढील प्रमाणे. रविवारी दुपारी 1.30 वाजता जामनेर येथे आगमन, श्री क्षेत्र रामवन मंदिर येथे दर्शन,त्यानंतर दुपारी 2.00 वाजता गांधी चौकातील भागीरथी वाचनालय येथे बंजारा समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद. सायंकाळी […]
विहिरीत उडी घेवून जावयाने संपविले आयुष्य !

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली येथील अपंग जावायाने विहिरीत उडी घेत दि. १४ जून रोजी आत्महत्या केली. सुरेंद्र रामराव बाविस्कर-पाटील (वय ४९) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून, ते प्रिप्राळा येथील रहिवासी होते. सुरेंद्र पाटील हे अपंग होते आणि चिंचोली येथील ते जावई म्हणून वास्तव्यास होते. त्यांनी गावातील चौकात असलेल्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत उडी घेतली. […]
जळगाव जिल्ह्यात वीज पडून दोन जणांचा मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचे वातावरण असून जिल्ह्यात वीज पडून तरुणासह दोन ठार झाले. पाचोरा आणि मुक्ताईनगर तालुक्यात शनिवारी या घटना घडल्या. मोहित जगतसिंग पाटील (२५, रा. खेडगाव नंदीचे, ता. पाचोरा) व शांतीलाल शंकर कठोरे (४४, रा. पूरणाड, ता. मुक्ताईनगर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव […]
व्यावसायिक लोकांनी किरकोळ ऐवजी घाऊक व्यवहार अधिक करावेत.

आजचे राशिभविष्य दि.१५ जून २०२५ मेष राशी श्रीगणेश सांगतात की, आर्थिक बाबींशी संबंधित अनेक कामे होतील आणि चांगले परिणाम मिळतील. घरातील वरिष्ठ सदस्यांच्या स्नेहाने आणि आशीर्वादाने कुटुंबात आनंदी आणि शिस्तबद्ध वातावरण राहील. कधीकधी संशयी स्वभावामुळे तुम्हाला आणि इतरांना त्रास होतो. आत्मपरीक्षण करून दोष सुधारणे चांगले राहील. तुमच्या महत्त्वाच्या कामांची प्रसिद्धी करू नका. अन्यथा कोणीतरी त्याचा […]