November 16, 2026 1:43 am

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » राष्ट्रीय » पोलीस दल हादरले : पोटच्या मुलीचा खून करत पोलिस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन !

पोलीस दल हादरले : पोटच्या मुलीचा खून करत पोलिस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन !

नाशिक : वृत्तसंस्था

आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:ही गळफास घेत जीवनयात्रा संपवल्याची खळबळजनक घटना नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे. जीवनयात्रा संपवल्याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी, काही दिवसांपूर्वीच या पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीसोबत घटस्फोट घेतला होता.

उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार स्वप्निल दीपक गायकवाड (३४, रा. जेलरोड) या पोलिस कर्मचाऱ्याने त्यांच्या सहा वर्षाची मुलगी भैरवीला गळफास देत तिचा खून केला. तसेच स्वत:ही गळफास घेत जीवन संपविले. मंगळवारी (दि. २४) सायंकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना योगमहाल अपार्टमेंट, नाशिकरोड या भागात उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व इतर अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच स्वप्निल गायकवाड यांचा पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. पत्नीसोबत वारंवार वाद होत असल्याने, त्यांनी घटस्फोट घेतला हाेता. तर मुलीचा त्यांच्याकडे ताबा होता. याच नैराश्यातून त्यांनी जीवन संपविले असावे, असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आदींनी भेट देऊन माहिती घेतली. जीवनयात्रा संपवल्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलिस अंमलदार स्वप्निल गायकवाड यांच्या एका भावाचा काही वर्षांपूर्वी गंभीर आजाराने मृत्यू झाला, तर दुसऱ्या भावाने पाच वर्षांपूर्वी रेल्वेखाली उडी घेत जीवनयात्रा संपवली होती. आता पोलिस कर्मचारी असलेले स्वप्निल यांनी जीवनयात्रा संपवल्याने कुटुंबात केवळ त्यांचे वृद्ध आई-वडील उरले आहेत.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!