November 14, 2026 7:54 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » मालवाहू ट्रक केबीनवर धडकली : ट्रॅव्हल्सविरुद्ध दिशेला झाली

मालवाहू ट्रक केबीनवर धडकली : ट्रॅव्हल्सविरुद्ध दिशेला झाली

जळगाव : प्रतिनिधी

औद्योगिक वसाहत परिसरातून मुख्य रस्त्याला लागणाऱ्या ट्रकला जळगावकडे येणाऱ्या ट्रॅव्हल्सने धडक देऊन ती विरुद्ध दिशेला जाऊन काँक्रीटच्या गटारीवर धडकली. यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात रविवारी (२० जुलै) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रेमंड कंपनीच्या मागील बाजूच्या रस्त्यावर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहत परिसरातील एसएस ९ सेक्टरकडून एक मालवाहू ट्रक मुख्य रस्त्यावर येत असतांना गाडेगावकडून येणाऱ्या खासगी कंपनीची ट्रॅव्हल्स ट्रकच्या चालकाकडील बाजूला केबीनवर धडकली. या धडकेवेळी ट्रॅव्हल्स चालकाने एकदम ब्रेक दाबल्याने ही ट्रॅव्हल्स विरुद्ध बाजूच्या रस्त्याकडे जाऊन काँक्रीटच्या गटारीवर धडकली. यामध्ये ट्रॅव्हल्सचे काच फुटून समोरील बाजू चक्काचूर झाली. तसेच ट्रकच्या केबिनचेही नुकसान झाले.

अपघानानंतर ट्रक चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला लावून क्लिनरसह तो पसार झाला. ट्रॅव्हल्स विरुद्ध दिशेला गेली त्यावेळी त्या रस्त्यावर एकही वाहन नव्हते. अन्यथा वाहने असती तर मोठा अनर्थ झाला असता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी जयेश पाटील, विशाल राजपूत यांनी दिली. अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स गाडेगाव येथील खासगी कंपनीतून कामगारांना ने-आण करणारी आहे. अपघातानंतर ट्रॅव्हल्समधील कामगारांना दुसऱ्या ट्रॅव्हल्समध्ये पाठविण्यात आले.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!