September 20, 2026 7:08 pm

१२०० खाटांचे खोटे कंत्राट ; मंत्रालयात ओळख देत ६ कोटींची फसवणूक

मुंबई : वृत्तसंस्था शासकीय रुग्णालयांसाठी १२०० आयसीयू खाटांच्या बनावट कंत्राटाचे आमिष दाखवून मुंबईतील एका व्यावसायिकाची तब्बल ६ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी नितीन गुप्ता, रमेश बनसोडे, बालाजी पवार, उद्धव भामरे आणि कौस्तुभ भामरे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार व्यावसायिक हे विद्याविहार येथील रहिवासी असून त्यांचा लाकडी आणि मेटल […]

दिल्ली दौऱ्यामागे मोठं काही? शिंदेंच्या बैठकींनी राजकीय चर्चांना मिळाली नवी दिशा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सत्तासंघर्ष, सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेले खटले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी अचानक दिल्लीत दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीहून परतल्यानंतर लगेचच शिंदे यांनी भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटातील काही मंत्री आणि आमदार सध्या […]

…आता कॉंग्रेसने माफी मागावी : मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई :वृत्तसंस्था मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे काँग्रेसप्रणित यूपीए सरकारने हिंदू दहशतवादाचा खोटा प्रचार करून केलेल्या षडयंत्राचा पर्दाफाश झाला, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. फडणवीस म्हणाले, “काँग्रेस आणि यूपीए सरकारने निवडणुकीत अल्पसंख्यक मतांसाठी हिंदू आणि भगवा दहशतवादाचा खोटा नरेटिव्ह तयार केला. त्यांनी […]

मोठी बातमी : मालेगाव बॉम्बस्फोटातील 7 आरोपींची निर्दोष सुटका !

नवी दिल्ली: वृत्तसंस्था मालेगावात २९ सप्टेंबर २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित बहुप्रतिक्षित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कायद्यांतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने गुरूवारी (दि.३१) महत्त्वपूर्ण निकाल दिला. तब्बल १७ वर्षांनी या बहुप्रितिक्षित खटल्यावर न्यायालयाने निकाल दिला आहे. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, मात्र विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी निकाल देताना स्पष्टपणे नमूद […]

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता मिळणार ; ९.७ कोटी शेतकऱ्यांना २०,५०० कोटींचा दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता येत्या २ ऑगस्ट २०२५ रोजी वितरित होणार आहे. या संदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वाराणसी येथे आयोजित […]

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयातील शंभर टक्के उपस्थिती विद्यार्थ्यांचा वृक्ष देऊन सन्मान.

जळगाव : प्रतिनिधी विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी काय करता येईल, वर्गातील अध्यापन रंजक कसे येईल आणि विद्यार्थ्यांना शाळा हे दुसरे घर कसे वाटेल, यासाठी शाळेत नवनवीन उपक्रम राबवण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची उपस्थिती नियमित राहण्यासाठी १०० टक्के हजेरी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वस्तू व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या […]

डॉ.घोलप यांच्या अडचणीत वाढ : कारवाईसाठी पाठवला अहवाल !

जळगाव : प्रतिनिधी जन्म मृत्यू नोंदणी विभगात पत्नीच्या जागेवर पतीला काम करण्याची मूभा दिल्याप्रकरणी डॉ. विजय घोलप यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा अहवाल तीन सदस्यांच्या समितीने आयुक्तांना दिला आहे. त्यामुळे डॉ. घोलप यांच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. महापालिकेच्या जन्म मृत्यू विभागात मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत एक महिला नोकरीला होती. सदर महिलेच्या जागेवर त्या महिलेचा […]

पाच मजली इमारतीवरुन पडून परप्रांतीय मजुराचा मृत्यू

भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील दीपनगर येथे सुरु असलेल्या सहाशे केव्ही वॅट क्षमतेच्या पाच मजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरुन पडून पप्पु अखायत्या बिलाला (वय २०, मूळ रा. मांडवी, तहसील झिरन्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) या परप्रांतीय मजूराचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील वसाहतीमध्ये […]

साखरपुड्याचे आमंत्रण न दिल्याने तुंबळ हाणामारी ; एकाचा मृत्यू !

यावल : प्रतिनिधी शहरातील बोरावल गेट भागात साखरपुड्याचे आमंत्रण न दिल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे याप्रकरणी सात जणांविरुद्ध दाखल गुन्ह्यांमध्ये खुनाच्या कलमाची वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या सात जणांनी २ जून रोजी सोमवारी रात्री आरिफ नजीर […]

१२ वर्षीय विद्यार्थ्यांचा शाळेत अचानक मृत्यू !

मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरातील जे. ई. स्कूलमध्ये सातव्या इयत्तेतील चैतन्य शंकर मराठे (१२, रा. मुंढोळदे, ता. मुक्ताईनगर) या विद्यार्थ्यांचा शाळेत अचानक मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी तीन वाजेच्या सुमारास घडली. सविस्तर वृत्त असे कि, चैतन्य हा बुधवारी मुंढोळदे येथून बसने शाळेत आला होता. सुट्टीत चैतन्यने जेवण केले आणि त्यानंतर तो मित्रांसोबत खेळत होता. थोड्या […]

error: Content is protected !!