मोठी बातमी : दिवाळीनंतर टप्प्याटप्याने होणार निवडणूक !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक दिवाळीनंतर म्हणजे डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मंगळवारी दिली. विशेष म्हणजे या निवडणुकीत ईव्हीएमला जोडण्यात येणाऱ्या व्हीव्हीपॅट मशीनचा वापर होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांनी यापूर्वी अनेकदा ईव्हीएम व व्हीव्हीपॅटमधील मतांची जुळवणी करण्याची मागणी केली आहे. […]
उत्तराखंड ढगफुटीचा कहर: ३४ सेकंदांत खीरगंगा गाव उद्ध्वस्त, ५० बेपत्ता, ४ मृत !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील उत्तराखंडमधील धराली येथे ढगफुटीमुळे खीर गंगा गाव वाहून गेले आहे. मंगळवारी दुपारी १.४५ वाजता ही घटना घडली. या घटनेचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत. त्यात असे दिसून येते की डोंगरावरून पावसाचे पाणी आणि ढिगारा येऊन ३४ सेकंदात संपूर्ण गाव वाहून गेले. उत्तरकाशीचे डीएम प्रशांत आर्य म्हणाले की, आतापर्यंत […]
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात सात महत्वाचे निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आज दि. ५ झालेल्या बैठकीत राज्याच्या विकासाला गती देणारे आणि सामाजिक कल्याणाला चालना देणारे सात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील स्टार्टअप्स, उद्योजकता, पायाभूत सुविधा, शासकीय मालमत्ता, कामगार, आरोग्य आणि नागरी विकास क्षेत्र याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. कौशल्य, रोजगार, […]
तर आम्हीच पंतप्रधान मोदींचा सत्कार केला असता ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था लाहोर, कराची , बलुचिस्तान वगैरे वगैरे आणि आता पीओके घेणार असं आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं. जर त्यांनी पीओके घेतला असता तर आम्हीच पंतप्रधान मोदींचा सत्कार केला असता असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चिमटा काढला. माध्यमांशी बोलताना विविध विषयांवर प्रतिक्रिया देतानाच राऊत यांनी मोदींवरही टीका केली. 7 तारेखला दिल्लीमध्ये […]
यूपीआय वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी : व्यवहारानंतर लगेच खात्यातील शिल्लक रक्कम दिसणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातील अनेक महत्वाचे बदल होत असतांना आता भारतीय राष्ट्रीय पेमेंटस् महामंडळाने (एनपीसीआय) घेतलेल्या नव्या निर्णयानुसार येत्या 1 ऑगस्ट 2025 पासून यूपीआय व्यवहारांमध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत. यापुढे प्रत्येक यूपीआय व्यवहारानंतर संबंधित युजरला त्याच्या बँक खात्यात उरलेली शिल्लक रक्कम लगेचच स्क्रीनवर दिसणार आहे. आजवर व्यवहार झाल्यानंतर वेगळ्या अॅपवर जाऊन शिल्लक […]
पाचोऱ्यात खळबळ : विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

पाचोरा : प्रतिनिधी चारित्र्यावर संशय घेत पती मारहाण करत असल्याने वारंवार होणाऱ्या जाचाला कंटाळून अखेर विवाहितेने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना पाचोरा शहरात घडली आहे. विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून मयत विवाहितेच्या पती विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गणपती नगर, पुनगाव रोड, पाचोरा येथील रहिवाशी माधुरी हिने सन […]
क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन कुटुंबियांमध्ये मोठा राडा !

जळगाव : प्रतिनिधी लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन कुटुंबियांमध्ये वाद होऊन एकमेकांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दोन्ही गटातील सात जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ ऑगस्ट रोजी रात्री कालिंका माता मंदिराजवळ घडली. याप्रकरणी ताराबाई सुकलाल शिंदे (६०, रा. कालिंका माता चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मुलांच्या […]
जळगावात ‘चड्डी गँग’चा धुमाकूळ : मंदिरांना टार्गेट करून घरात देखील चोरी !

जळगाव : प्रतिनिधी मध्यरात्रीच्या वेळी मंदिरांचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी दोन मंदिरांमधून चांदीच्या पादुका, मूर्ती, दानपेटीतील रक्कम व इतर साहित्य चोरून नेले. तर तिसन्या मंदिरात त्यांच्या हाती काहीच न लागल्याने तेथून पेन ड्राईव्ह चोरून नेला. याशिवाय बाहेर गावी गेलेल्यांकडे घरफोडी केली. ही घटना दि. ३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रायसोनी नगरात घडली. एकाच रात्री […]
मोठी बातमी : अखेर मनपातील ‘त्या’ अधिकाऱ्याचे निलंबन !

जळगाव : ५ ऑगस्ट २०२५ जळगाव महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना सहकारी महिला डॉक्टरशी गैरवर्तन व जन्म मृत्यू विभागात पत्नीच्या जागी पतीला काम करण्याची मुभा देणे या दोन्ही प्रकरणात दोषी धरून निलंबित करण्यात आल्याचे आदेश आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेत मनपाच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागात कार्यरत असलेल्या […]
कामाच्या ठिकाणी तुमचे बौद्धिक कौशल्य पाहून सर्वांना आश्चर्य वाटणार !

आजचे राशीभविष्य दि.५ ऑगस्ट २०२५ मेष राशी आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी विशेष सहकार्य आणि आदर मिळेल. काही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी मिळाल्याने तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसायात नफा कमावण्याची संधी मिळेल. तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळेल. वृषभ राशी आज तुमच्या मुलांप्रती असलेली जबाबदारी पार पडेल. तुम्हाला जवळचा मित्र भेटेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस असेल. कामाच्या ठिकाणी तुमचे […]