November 13, 2026 7:01 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » मोठी बातमी : अखेर मनपातील ‘त्या’ अधिकाऱ्याचे निलंबन !

मोठी बातमी : अखेर मनपातील ‘त्या’ अधिकाऱ्याचे निलंबन !

जळगाव : ५ ऑगस्ट २०२५

जळगाव महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना सहकारी महिला डॉक्टरशी गैरवर्तन व जन्म मृत्यू विभागात पत्नीच्या जागी पतीला काम करण्याची मुभा देणे या दोन्ही प्रकरणात दोषी धरून निलंबित करण्यात आल्याचे आदेश आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेत मनपाच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागात कार्यरत असलेल्या महिलेच्या जागी तिचा पती काम करत असल्याचा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची चौकशी महिन्यापासून सुरू होती. तीन सदस्य असलेल्या चौकशी समितीकडून चौकशी अहवाल मनपा आयुक्तांकडे सादर करण्यात आला होता. तसेच सहकारी महिला अधिकाऱ्याशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी महिलेने तक्रार केली होती. या तक्रारीचा प्राथमिक अहवाल विशाखा समितीने आयुक्तांना सादर केला होता त्यामुळे दोन्ही प्रकरणांमध्ये डॉ. विजय घोलप यांना दोषी धरून निलंबित करण्यात आले आहे.

कंत्राटी नोकरी प्रकरणानंतर डॉ. विजय घोलप यांनी सहकारी महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी महिला अधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर विशाखा समितीकडून डॉ. घोलप यांची चौकशी सुरू आहे. यात डॉ. विजय घोलप यांना कारणे दाखवा नोटीस बजावून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार डॉ. घोलप यांनी लेखी खुलासा टपालाद्वारे समितीकडे पाठविला होता. महापालिकेच्या जन्म मृत्यू नोंदणी विभागात महिला कर्मचाऱ्याच्या जागेवर त्या महिलेचा पती काम करीत होता. अनेक दिवस महिला कर्मचारी कामावर नसतांना तिचा पती त्याठिकाणी काम करीत असल्याचे उघड झाले होते. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने अहवाल आयुक्तांना सादर केला होता. त्यावर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी हा अहवाल तपासणीसाठी आस्थापना शाखेकडे पाठविला होता.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!