November 12, 2026 6:45 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » एक लाखांच्या गांजासह तीन अटकेत : यावल पोलिसांची दमदार कारवाई !

एक लाखांच्या गांजासह तीन अटकेत : यावल पोलिसांची दमदार कारवाई !

यावल : प्रतिनिधी

शहराबाहेर चोपडा रस्त्यावर वन विभागाच्या कार्यालयासमोर ४ किलो गांजा नेतांना दोघांना पकडण्यात आले. या दोघांनी वाघझिरा येथून हा गांजा आणल्याची कबुली दिली असून पोलिसांना या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील वाघझिरा येथून गांजाची खरेदी करून दोन जण भुसावळकडे जात असल्याची गोपनिय माहिती फैजपूरचे डीवायएसपी अनिल बडगुजर, यावलचे पो.नि. रंगनाथ धारबळे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक अजय वाढवे, उपनिरीक्षक अनिल महाजन, उपनिरीक्षक एम. जे. शेख, हवालदार अर्शद गवळी, अमित तडवी, वासुदेव मराठे यांच्या पथकास यावल ते चोपडा मार्गावर सापळा लावण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार २५ ऑगस्टला ११ वाजेच्या सुमारास वाघझिरा गावाकडून दुचाकी (एमएच- १९, ४११६) ने भुसावळ येथील मुस्लीम कॉलनीतील युसूफ शहा मुलजार शहा आणि भुसावळच्या गरीब नवाज भागातील युनूस सुलतान शेख (मूळ रा. मिठी खाडी निंबायत, सुरत, गुजरात) या दोघांना पथकाने शहराबाहेर वन विभागाच्या कार्यालयासमोर पकडले. त्यांच्याकडून ४ किलो ६० ग्रॅम गांजा जप्त केला. तर गांजासह इतर साहित्य असा एकुण १ लाख ९०० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांनी हा गांजा त्यांनी वाघझिरा येथून भामसिंग पुट्या बारेला यांच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार विजय पाचपोळे, हेड कॉन्स्टेबल रोहिल गणेश, पोलीस कॉन्स्टेबल वसीम तडवी करत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!