November 14, 2026 6:57 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » ताज्या » नदीत पाय घसरून नात गेली वाहून अन आजोबांचा दुर्देवी मृत्यू !

नदीत पाय घसरून नात गेली वाहून अन आजोबांचा दुर्देवी मृत्यू !

पाचोरा : प्रतिनिधी

गेल्या तीन दिवसापूर्वी जिल्ह्यातील पाचोरा व जामनेर तालुक्यात झालेल्या पावसामुळे सर्वच नदीला पाणी आले आहे. तर तालुक्यातील वडगाव टेक येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. लहानपणीच पितृछत्र हरपलेले… आई मजुरीसाठी बाहेरगावी गेलेली… अशातच आजोबांकडे (आईचे वडील) राहणारी १४ वर्षीय मुलगी हिवरा नदीत पाय घसरून पडल्याने वाहून गेली. या धक्क्यामुळे तिचे पालनकर्ता असलेल्या आजोबांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. अंगावर शहारे आणणारी ही घटना वडगाव टेक (ता. पाचोरा) येथे शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, नीता संजय भालेराव (१४) असे या वाहून गेलेल्या मुलीचे तर, शामराव विठ्ठल खरे (७२) असे आजोबांचे नाव आहे. ती मामीसोबत दुपारी एकच्या सुमारास हिवरा नदीवर धुणे धुण्यासाठी गेली होती. त्यावेळी पाय घसरल्यामुळे नीता नदीच्या प्रवाहात वाहून गेली. तिला वाचविण्यासाठी मामीसुद्धा नदीत उतरली; मात्र गावकऱ्यांनी उड्या मारून मामीचे प्राण वाचवले. ही दुर्दैवी घटना कळताच, नीता हिचे आजोबा शामराव खरे यांना धक्का बसला आणि काही वेळातच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. नीता ही पाचोरा येथे इयत्ता नववीत शिक्षण घेत होती. ती चार वर्षांची असताना वडिलांचा मृत्यू झाला तर आई मजुरीसाठी दुसऱ्या शहरात गेली आहे. आईचे वडील शामराव खरे यांच्याकडे नीता आणि तिची बहीण राहत होते. आता नीताही वाहून गेली तर घराचा आधार असलेले आजोबा नाहीत. आता शनिवारी तरी नीताचा शोध लागेल काय? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!