Home » जळगाव » जळगावात एमडी ड्रग्सविरोधात मोठी कारवाई; 62.07 ग्रॅम अमली पदार्थ जप्त, एक अटकेत

जळगावात एमडी ड्रग्सविरोधात मोठी कारवाई; 62.07 ग्रॅम अमली पदार्थ जप्त, एक अटकेत

जळगाव | पब्लिक लाईव्ह न्यूज : जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 62.07 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा घातक अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत एका संशयित तस्कराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून अमली पदार्थ, मोबाईल फोन आणि दुचाकीसह एकूण ₹3 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (31 जुलै) रात्री सुमारे 10.40 वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ (एफसीआय गोडाऊन), सेक्टर क्र. A-14 समोरील रस्त्यावर पोलीस पथक गस्त घालत होते. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीची पोलिसांनी चौकशी करून अंगझडती घेतली. झडतीदरम्यान त्याच्याकडे मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेला एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेत अटक केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इम्रान खान हयात खान (वय 36) असे असून तो मूळचा आडगाव (ता. जळगाव) येथील रहिवासी असून सध्या करीमनगर, फातिमा नगर, एमआयडीसी, जळगाव येथे वास्तव्यास आहे. तपासादरम्यान रफीक उर्फ गोल्डन (रा. मालेगाव, जि. नाशिक) याने आरोपीला विक्रीसाठी एमडी ड्रग्स पुरवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत.

या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून 39.06 ग्रॅम एमडी (किंमत ₹1.96 लाख), 11 प्लास्टिक पिशव्यांमधील 9.10 ग्रॅम एमडी (किंमत ₹36 हजार) तसेच 18 प्लास्टिक पिशव्यांमधील 13.91 ग्रॅम एमडी (किंमत ₹56 हजार) असा एकूण 62.07 ग्रॅम एमडी (एकूण किंमत ₹2.88 लाख) जप्त केला. याशिवाय रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन (₹20 हजार) आणि हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (₹50 हजार) असा एकूण ₹3.58 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस फौजदार अतुल रघुनाथ वंजारी यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, अपर पोलीस अधीक्षक नितीन गणापुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (जळगाव विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड तसेच पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, सहायक पोलीस फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल मुरलीधर धनगर, अकरम शेख, योगेश घुगे, प्रविण भालेराव, किशोर पाटील, विजय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल छगन तायडे, रविंद्र कापडणे, प्रदीप सपकाळ, राहुल रगडे तसेच फॉरेन्सिक युनिटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित माळी आणि संघपाल तायडे यांनी सहभाग घेत उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी बजावली.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *