अखेर दोन सराईत चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील रावेर पोलीस ठाणेच्या गुन्हे शोध पथकाने सोनसाखळी जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणत दोन सराईत चोरांना अटक केली आहे. संशयितांच्या ताब्यातून दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हे अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) येथील रहिवासी आहेत. रावेर येथे दाखल गुन्हा क्रमांक ४७४/२०२५ (कलम ३०४(२)) मध्ये शोभाबाई सुरेश […]
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय : राज्यातील शेतकऱ्यांना ठरणार फायदेशीर !

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेची अर्ज प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार या योजनेचा लाभ महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना थेट मिळणार आहे. यापूर्वी अर्जाची प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने केली जात होती. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या निर्णयाची माहिती दिली. अपघातात शेतकरी मृत्यूमुखी पडल्यास 2 लाख रुपये […]
धरणगावनजीक एलसीबीची मोठी कारवाई : साडेसात किलो गांजा जप्त

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव–चोपडा रस्त्यावरील शासकीय आयटीआयजवळ पोलिसांनी सुमारे साडेसात किलो गांजा जप्त केला. सोमवार (दि.3) रोजी रात्री आठच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव – चोपडा रस्त्यावरील शासकीय आय टी आय जवळ काल दि. ३ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सुमारे साडेसात किलोचा गांजा पकडल्याची घटना घडली आहे. ही […]
‘रीलस्टार’चा खरा चेहरा उघड: एसटीत महिलांना लुबाडणारी ‘बबली’ गजाआड

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून अनेक व्यक्ती सोशल मीडियावर व्हीडीओच्या माध्यमातून चर्चेत येत असताना आता सध्या एक रीलस्टार वेगळ्या प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. खरे तर ती सोशल मीडियावर रीलस्टार म्हणून प्रसिद्ध. तिचे पन्नास हजारांवर फॉलोअर्स. पण तिचा खरा ‘उद्योग’ होता एसटी बसमध्ये महिला प्रवाशांना लुबाडण्याचा, भोळेपणाचा आव आणून सोन्याचे दागिने, पर्स चोरण्याचा… शेवगाव-पाथर्डी परिसरातील […]
अंजली दमानिया पुन्हा एकदा आक्रमक : एफआयआरमध्ये पार्थ पवार यांचे नाव समाविष्ट करा !

मुंबई : वृत्तसंस्था पुणे येथील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. या घोटाळ्याचा प्राथमिक तपास अहवाल तात्काळ समोर आला पाहिजे, अशी मागणी करत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना लक्ष्य केले आहे. “एफआयआरमध्ये अमेडिया कंपनी आणि पार्थ पवार यांचे नाव समाविष्ट झालेच पाहिजे. एकदा […]
परळीत रात्री स्ट्राँग रूमबाहेर ‘हाय व्होल्टेज’ ड्रामा : पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज !

बीड : वृत्तसंस्था राज्यभरात नगर परिषद निवडणुकीचे मतदान मंगळवारी पार पडले. निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालाच्या आधीच स्ट्राँग रूमच्या सुरक्षेवरून वातावरण चांगलेच तापले आहे. बीडच्या परळीमध्ये बुधवारी रात्री नगर परिषदेत स्ट्राँग रूमची पाहणी करण्यासाठी गेलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दीपक देशमुख आणि उपस्थित कर्मचारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. […]
जळगाव एसीबीची कामगिरी : दहा हजारांची लाच घेणाऱ्या कंत्राटी अभियंत्याला ठोकल्या बेड्या !

जळगाव : प्रतिनिधी पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलचा दुसरा हप्ता जमा करण्याच्या मोबदल्यात दहा हजारांची लाच घेणाऱ्या गृहनिर्माण कंत्राटी अभियंता गणेश संभाजी पाटील (वय ३१) सह सागर शांताराम कोळी (वय ३०, रा.निंभोरा, ता. धरणगाव) या पंटरला दहा हजारांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी दुपारच्या सुमारास झाली असून याप्रकरणी धरणगाव पोलिसात […]
चौघांनी केली पाणीपुरी विक्रेत्याला जबर मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी गांधी उद्यानाच्या गेटजवळ किरकोळ कारणावरून वाद होऊन चार जणांनी पाणीपुरी विक्रेत्याला आणि त्याच्या भावाला मारहाण केल्याची गंभीर घटना मंगळवारी, २ डिसेंबर रोजी घडली. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि , विकास भागवत लिहेलकर (वय २७, रा. सम्राट कॉलनी, जळगाव) आणि त्याचा भाऊ चेतन भागवत […]
आज तुम्ही तुमचे काम वेळेवर पूर्ण कराल, ज्यामुळे तुम्ही समाधानी राहाल.

आजचे राशिभविष्य दि. ४ डिसेंबर २०२५ मेष राशी तुमच्या जोडीदारासोबत सुरू असलेला वाद आज संपेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याबद्दल तुम्हाला थोडी काळजी वाटू शकते. तब्येत जपा. वृषभ राशी तुमच्या चालू असलेल्या समस्या सोडवल्या जातील, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही घरी धार्मिक विधी करण्याची योजना आखू शकता. जीवन सुधारण्यासाठी तुम्ही अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्याल. आर्थिक स्थिती […]