September 21, 2026 7:40 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

धक्कादायक : सौर पॅनेल कंपनीतील पाण्याचा टँक कोसळून तीन कामगारांचा मृत्यू, ११ जखमी !

नागपूर : वृत्तसंस्था नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात शुक्रवारी (दि. १९) दुपारी एक भीषण औद्योगिक दुर्घटना घडली. येथील ‘अवाडा’ या सौर पॅनेल निर्मिती करणाऱ्या कंपनीत पाण्याचा टँक टॉवर अचानक कोसळल्याने तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर 11 कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेल्याने गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण औद्योगिक परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, […]

स्टेट बँकेसमोर पहाटे आग; चार दुकाने जळून खाक

जळगाव : प्रतिनिधी शहरातील कालिका माता परिसरात शुक्रवारी (दि. १९) पहाटे भीषण आगीची घटना घडून परिसरात मोठी खळबळ उडाली. काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळ, स्टेट बँकेसमोरील पत्र्याच्या शेडखाली असलेल्या काही दुकानांना पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. आगीचे लोळ काही मिनिटांतच वेगाने पसरले. त्यामुळे पत्र्याच्या शेडखालील सलग असलेली दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. या […]

पिंप्राळ्यात विष प्राशन करून तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विनोद सोनवणे (वय ४०, रा. पिंप्राळा, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवार (दि. १७ डिसेंबर) रोजी विनोद सोनवणे यांनी विषारी औषध प्राशन केल्यानंतर त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल […]

ठाकरे गट युतीच्या चर्चांना वेग; अनिल परब–राज ठाकरे भेटीने राजकीय हालचालींना उधाण !

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर आपला महापौर बसवण्यासाठी शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यात जोरदार चढाओढ सुरू आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात संभाव्य युतीची चर्चा जोर […]

जामनेरच्या तरुणाचा पोत्यात बांधलेला मृतदेह जंगलातील तलावात आढळला !

जळगाव : प्रतिनिधी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जामनेर येथील २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह रामदेववाडी परिसरातील जंगलातील तलावात पोत्यात बांधलेल्या आढळून आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, एमआयडीसी पोलिसांनी गुजरात येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील रहिवासी निलेश […]

रात्री फिरायला नेले अन्… दुचाकी अपघातात पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

रावेर : प्रतिनिधी निंभोरा येथील पाच वर्षांच्या चिमुकल्याला रात्री फिरायला नेण्याचा वडिलांचा निर्णय अखेर जीवघेणा ठरला. दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्य शंकोपाल याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सविस्तर वृत्त असे कि, निंभोरा येथे वास्तव्यास असलेले कैलास शंकर शंकोपाल हे मंगळवारी रात्री घराबाहेर फिरण्यासाठी निघाले होते. यावेळी पत्नीने […]

बळीराम पेठेत अल्पवयीन मुलाला मारहाण !

जळगाव : प्रतिनिधी शहरातील बळीराम पेठ परिसरात अल्पवयीन मुलांच्या टोळक्याने रस्त्याने जात असलेल्या मोहम्मद आदिल मजील अन्सारी (वय १५, रा. कांचन नगर) याच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. कोणतेही कारण नसताना आदिलला अडवून सायकलवरून खाली ओढत त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी व दगडांनी बेदम मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात आदिलच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून […]

भाजपची मोठी घोषणा : आगामी मनपा निवडणुकीची धुरा आमदार राजूमामा भोळे यांच्या खांद्यावर

जळगाव : प्रतिनिधी जळगाव: जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मोठी घोषणा केली आहे. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांची जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे ‘निवडणूक प्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्र जारी करत ही महत्त्वाची जबाबदारी आ. भोळे यांच्या खांद्यावर दिली आहे. जळगाव शहरात आधी लोकसभा आणि त्यानंतर […]

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग १ मध्ये बहुपक्षीय संघर्ष, जागा वाटपाचा पेच वाढला

जळगाव : प्रतिनिधी महापालिकेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजप, शिवसेना (दोन्ही गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम या पक्षांमध्ये काटेकोर टक्कर होण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रभागात गेल्या निवडणुकीत भाजपने सर्व चार जागा जिंकल्या होत्या; मात्र आता समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. जळगाव महापालिकेच्या रणसंग्रामात प्रभाग १ हा […]

अनुभवी लोकांचे मार्गदर्शन तुमच्या वाढीसाठी उपयुक्त ठरेल आणि सध्या तुमचे उत्पन्न तेवढेच राहील.

आजचे राशिभविष्य दि.१९ डिसेंबर २०२५ मेष राशी आज तुमच्या व्यवसाय योजनेत बदल करणे महत्वाचे आहे. अनुभवी लोकांचे मार्गदर्शन तुमच्या वाढीसाठी उपयुक्त ठरेल आणि सध्या तुमचे उत्पन्न तेवढेच राहील. नोकरी करणाऱ्यांना लवकरच स्थलांतर करावे लागू शकते. वृषभ राशी आज तुमच्यावर कामाचा मोठा ताण असेल, त्यामुळे तुम्हाला आळस दूर करावा लागेल. अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी हानिकारक असू शकतो, ज्यामुळे […]

error: Content is protected !!