September 21, 2026 5:42 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :

मनपाच्या दुर्लक्षामुळे सिंधी कॉलनीत घाणीचे साम्राज्य; नागरिकांमध्ये संताप

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील सिंधी कॉलनी परिसरासह नवीन जोशी कॉलनी आणि सम्राट कॉलनी भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कचरा संकलन पूर्णपणे ठप्प झाल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मनपाच्या आरोग्य विभागाकडून येणारी घंटागाडी वेळेवर न आल्याने रस्त्यांवर, चौकांमध्ये आणि मोकळ्या जागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचले असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याचा आरोप स्थानिक […]

अजित पवारांचा मृत्यू अपघात की घातपात? भुजबळांच्या वक्तव्याने संशय गडद

नाशिक : वृत्तसंस्था  सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. “अजित पवार यांचे सरळ चाललेले विमान अचानक पलटी झाले. या प्रकरणात निश्चितच कुठेतरी काहीतरी गडबड झाली आहे,” असे खळबळजनक विधान भुजबळ […]

अजित पवारांचा अपघात दुर्दैवीच; राऊतांकडे पुरावे आहेत का? – भाजपचा सवाल

मुंबई : वृत्तसंस्था उद्या भूकंप, त्सुनामी किंवा पूर आला तरी संजय राऊत त्याला ‘ऑपरेशन लोटस’चा भाग असल्याचे म्हणतील, असा खोचक टोला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी लगावला. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर पुन्हा संशय व्यक्त केल्यानंतर नवनाथ बन यांनी हे प्रत्युत्तर दिले. संजय राऊत यांनी अजित पवारांचा […]

युटोपीया इंग्लिश मीडियमच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांचा कलाविष्कार

विज्ञान प्रदर्शन, बाल आनंद मेळाव्यालाही उत्स्फुर्त प्रतिसाद जळगाव : प्रतिनिधी पिंप्राळा येथील युटोपीया इंग्लिश मीडियम स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून चिमुकल्यांच्या कलागुनांना भरभरून प्रतिसाद दिला. युटोपीया इंग्लिश मीडियम स्कुलच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त दि.३० जानेवारी रोजी विज्ञान प्रदर्शन व बालआनंद मेळावा भरविण्यात आला होता. यावेळी विज्ञान प्रदर्शनात शाळेच्या […]

पाचोर्‍यात लाचखोरीचा पर्दाफाश; कृषी विभागाचा कारभार उघड

जळगाव : प्रतिनिधी  शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदीवर शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी कृषी विभागातील अधिकाऱ्याने थेट लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा तालुक्यात उघडकीस आला आहे. ६ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित कृषी उपअधिकाऱ्यासह दोन खाजगी व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव घटकाने केली आहे. […]

मोठी बातमी : तांड्यांना स्वतंत्र ओळख देण्याचा मंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था  राज्यातील उपेक्षित आणि मुख्य गावांपासून दूर असलेल्या सर्व तांड्यांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या निर्णयामुळे तांड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचे अस्तित्व मिळून १५व्या वित्त आयोगाचा निधी थेट उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धाराशिव जिल्ह्यातील ईट, येणेगूर, आपसिंगा आणि ढोकी येथील प्रचारसभांमध्ये ते […]

अयोध्या नगर घरफोडी प्रकरण उघड; मध्यप्रदेशातील दोन आरोपी अटकेत !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या आंतरराज्य घरफोडी टोळीला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईत मध्यप्रदेशातील दोन सराईत आरोपींसह एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले असून चोरीस गेलेले १९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  जळगाव शहरातील आयोध्या नगर भागात राहणारे फिर्यादी पंढरीनाथ पाटील हे […]

धरणगावात आढळलेल्या इराणी महिलेची भारतातून हकालपट्टी

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव फरनाज हमीद रेझा येथे बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या (३८) हिची अखेर भारतातून हकालपट्टी करण्यात येत असून तिला फेब्रुवारी रोजी जळगावातून दिल्लीला नेण्यात येणार आहे. त्यानंतर ६ रोजी विमानाने तिला इराणमध्ये पाठविण्यात येईल. धरणगाव येथील कुरेशी मोहल्ल्यात एक वर्षापासून इराणी महिला मुलासह वास्तव्य करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. त्यानंतर […]

रावेर पोलिसांची कारवाई : दुचाकी चोरणाऱ्या तीन जणांच्या टोळीस अटक !

रावेर : प्रतिनिधी शहरातील दुचाकी चोरणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १३ लाख १० हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी कोरपावली येथून पोलिसांनी जप्त केल्या आहेत. चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांना रावेर शहरातील चक्क ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, गौरव दत्तात्रय तायडे (२०), तौसिफ तैय्यब आणि अब्दुल रहेमान तैय्यब पटेल (तिन्ही रा. कोरपावली, […]

वैवाहिक जीवन सुसंवादी राहील. महिला आज ऑनलाइन नवीन पदार्थ शिकण्याचा प्रयत्न करतील.

आजचे राशिभविष्य दि.३ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आज कोणतंही नवीन काम सुरू करण्यापूर्वी, एक सखोल योजना बनवा आणि तुमच्या पालकांचा सल्ला घ्या. सरकारी धोरणे आणि नियमांकडे बारकाईने लक्ष दिल्यास तुमचे काम सोपे होईल. घाई टाळा, हळू, शातंपणे निर्णय घ्या, काम करा. वृषभ राशी आज तुम्ही मित्रांसोबत जुन्या समस्यांवर चर्चा कराल, ज्यामुळे चांगला उपाय मिळेल. तुमचे […]

error: Content is protected !!