November 6, 2026 10:22 pm

लाईव्ह न्यूज :
जळगाव शहराच्या विकासाला १० कोटींचे बळ! राजूमामांच्या पाठपुराव्याने १९ प्रभागांना निधी; प्रवेशमार्गही उजळणार! जळगावच्या उद्योगांना आता विदर्भ-मराठवाड्याप्रमाणे प्रोत्साहने! ‘डी प्लस’ दर्जाची अंमलबजावणी; राजूमामांच्या पाठपुराव्याला यश जळगावातील लाचखोर अधिकारी सतीश शिसोदे यांच्या घरात ५.१६ कोटींचे घबाड! सोन्याचे बिस्कीट, प्लॅटिनम अन् दोन घरे उघड! जिल्हा बँक निवडणुकीत किशोर पाटील यांना धक्का! पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद सातपुड्यातील ७,५०० एकर जंगलाची कत्तल? वनजमिनीवरील अतिक्रमणाचा गंभीर आरोप; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

Home » जळगाव » पाचोर्‍यात लाचखोरीचा पर्दाफाश; कृषी विभागाचा कारभार उघड

पाचोर्‍यात लाचखोरीचा पर्दाफाश; कृषी विभागाचा कारभार उघड

जळगाव : प्रतिनिधी 

शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदीवर शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी कृषी विभागातील अधिकाऱ्याने थेट लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पाचोरा तालुक्यात उघडकीस आला आहे. ६ हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संबंधित कृषी उपअधिकाऱ्यासह दोन खाजगी व्यक्तींविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव घटकाने केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , तक्रारदार हे जोगेवडगाव, ता. पाचोरा येथील शेतकरी असून त्यांनी शासनाच्या कृषी योजनेअंतर्गत नांगर व रोटर खरेदीसाठी पाचोरा कृषी कार्यालयात ऑनलाईन अर्ज केला होता. अर्जास मंजुरी मिळाल्यानंतर त्यांनी साहित्य खरेदी केले. त्यानंतर खरेदी केलेल्या साहित्याचे फोटो काढून ते योजनेच्या संकेतस्थळावर अपलोड करून अनुदान मिळवून देण्यासाठी कृषी उपअधिकारी लिलाधर देशमुख यांनी तक्रारदाराकडे ६ हजार रुपयांची लाच मागितली, तसेच ही रक्कम अंबेवडगाव येथील धनदाई कृषी केंद्राचा संजय पाटील याच्याकडे देण्यास सांगितले.

या प्रकाराला कंटाळून तक्रारदाराने २ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. यावेळी तडजोडीअंती ५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करण्यात आले आणि ती रक्कम धनदाई कृषी केंद्रावर देण्यास सांगण्यात आले.

त्यानुसार तक्रारदार धनदाई कृषी केंद्र, अंबेवडगाव येथे गेला असता संजय पाटील उपस्थित नव्हता. मात्र दुकानावर असलेला नितीन निकम याने सदर रक्कम लाच असल्याची पूर्ण जाणीव असूनही पंचासमक्ष स्वीकारली. यावरून कृषी उपअधिकारी लिलाधर देशमुख, खाजगी इसम संजय पाटील व नितीन निकम यांच्याविरुद्ध पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

K P chavan
Author: K P chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!