दुचाकी चोरट्यांना पोलिसांचा ‘ब्रेक’; दोन आरोपी पोलीस कोठडीत

जळगाव : प्रतिनिधी शहरातील गर्दीच्या ठिकाणांवरून दुचाकी चोरी करून पोलिसांना आव्हान देणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. काशिनाथ चौकातून चोरीला गेलेली हिरो होंडा सुपर स्प्लेंडर दुचाकी हस्तगत करत पोलिसांनी दोन अट्टल चोरांना अटक केली आहे. अटकेतील आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील फिर्यादी शालिक पाटील (रा. धानोरा खु., […]
जैन इरिगेशनचा तिमाही निकाल दमदार : कंपनीच्या उत्पन्नात १७.४ टक्क्यांची वाढ

जळगाव : प्रतिनिधी जळगाव, ४ (प्रतिनिधी) – कृषी क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२६ तिसऱ्या तिमाहीचे (Q3FY26) आणि नऊ महिन्यांचे (9MFY26) एकत्रित आर्थिक निकाल जाहीर केले. त्यात कंपनीच्या उत्पन्नात (महसूलात) १७.४ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीचे एकत्रित उत्पन्न ₹१,५९८ कोटींवर पोहोचले असून EBITDA (व्याज, कर, घसारा व अमॉर्टायझेशनपूर्व नफा) ₹१६८ कोटींचा […]
सत्तेशिवाय जयंत पाटील फार दिवस राहू शकत नाहीत”; सदाभाऊ खोतांचा टोला

सोलापूर : वृत्तसंस्था राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा खळबळजनक दावा आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे. सत्तेशिवाय ते फार दिवस राहू शकत नाहीत. कधी उडी मारायची याचीच ते वाट पाहत आहेत, असा टोला खोत यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता […]
धक्कादायक : पद्मालयच्या जंगलात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र पद्मालय मंदिर परिसरातील घनदाट जंगलात बुधवारी एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून, प्राथमिक पुराव्यांवरून हा निर्घृण खून असल्याचे समोर येत आहे. बुधवारी, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास काही नागरिकांना जंगलात संशयास्पद मृतदेह दिसून आल्यानंतर हा […]
…तर तुला जिवंत सोडणार नाही : अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

जळगाव : प्रतिनिधी सोबत फिरायला चल असे सांगून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सुरत येथे नेऊन तिच्यावर राहुल रमेश राठोड (वय २५, रा. पिंप्राळा) याने अत्याचार केला. हा प्रकार दि. ३० जानेवारी रोजी उघडकीस आला. या प्रकरणी ३ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका […]
मुलीला जीवेठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार !

पाचोरा : प्रतिनिधी मुलीला जीवेठार मारण्याची धमकी देत विवाहितेवर वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी संशयित बाळू काळू राठोड (रा. कु-हाड तांडा, ता. पाचोरा) याच्याविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गुन्हा पाचोरा पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड तांडा येथील संशयित बाळू काळू […]
रावेर-विवरे मार्गावर दुचाकींचा भीषण अपघात, दोन तरुण ठार

रावेर : प्रतिनिधी विवरे खुर्द येथे घडलेल्या भीषण दुचाकी अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे. दोन्ही मृत तरुण एकुलते व अविवाहित असल्याने संबंधित कुटुंबांवर एकाच वेळी शोककळा पसरली आहे. ही घटना दि. ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास रावेर-विवरे मार्गावरील श्री बिजासनी माता मंदिराजवळील पुलानजीक घडली. […]
शेअर मार्केटच्या जाळ्यात अडकवून तरुणीची १० लाखांची फसवणूक

भुसावळ : प्रतिनिधी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा आर्थिक फायदा करून देण्याचे आमिष दाखवत शहरातील एका २७ वर्षीय तरुणीची तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणुकीनंतर संबंधित तरुणीवर लग्नासाठी दबाव टाकत तिचा पाठलाग व विनयभंग केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात […]
आर्थिक व्यवहारात विशेषतः सावधगिरी बाळगा आणि कोणालाही पैसे उधार देणे टाळा.

आजचे राशिभविष्य दि.५ फेब्रुवारी २०२६ मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. कामाचं ओझं वाढू शकतं, परंतु तुमच्या कष्टांमुळे आणि समर्पणामुळे तुम्ही ते वेळेत पूर्ण करू शकाल. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला अधिक नियोजन करणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी मतभेद होऊ शकतात, त्यामुळे बोलताना संयम बाळगा. आपल्या आरोग्याबाबत थोडी […]