अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्षासाठी लाच; जळगावात तलाठीसह दोघांना एसीबीची रंगेहात अटक ?

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील महसूल विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून तलाठीसह दोन जणांना लाच स्वीकारताना रंगेहात अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अवैध वाळू वाहतुकीकडे दुर्लक्ष करण्यासाठी संगनमताने लाच स्वीकारल्याचा आरोप संबंधितांवर ठेवण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जळगाव शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची तक्रार होती. ही वाहतूक […]
जळगावला 300 कोटींचा वाढीव निधी हवा; पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे ठाम मागणी !

जिल्हा विकास आराखड्याचे जिल्हाधिकारी यांनी केले प्रभावी सादरीकरण; वाढीव निधीस सकारात्मक प्रतिसाद जळगाव : प्रतिनिधी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 चा प्रारूप आराखडा अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव जिल्ह्यासाठी डीपीडीसी […]
पाळधी महामार्गावर भीषण अपघातात एक ठार तर तीन जखमी !

जळगाव : प्रतिनिधी जळगाव-संभाजीनगर महामार्गावरील पाळधी गावाजवळ आज दुपारी भीषण अपघात घडला. भरधाव वाहनाने नियंत्रण गमावल्याने झालेल्या धडकेत एका निष्पाप जीवाचा जागीच बळी झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी गाव महामार्गाला लागून असल्याने येथे वाहने नेहमीच […]
अंत्यदर्शन आणि परीक्षा एकाच दिवशी; जान्हवीची अदम्य जिद्द

भंडारा : वृत्तसंस्था घरात वडिलांचे पार्थिव पडलेले असताना जान्हवी हौशीलाल राहांगडालेने दाखवलेले धैर्य पाहून संपूर्ण जिल्ह्याचे डोळे पाणावले आहेत. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या आंबागड येथील रहिवासी जान्हवीने, वडिलांच्या निधनाचे अतीव दुःख बाजूला ठेवून, बारावीचा इंग्रजीचा पेपर दिला आणि आपल्या अदम्य जिद्दीचे दर्शन घडवले. सोमवारी (९ फेब्रुवारी) दुपारी हौशीलाल राहांगडाले (५१) हे सायकलने घरी परतत असताना […]
अजित पवारांच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी व्हावी : मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई: वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणावर ठाम विश्वास व्यक्त करत सांगितले की, या घटनेचे सत्य लवकरच बाहेर येईल. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडे असलेली माहिती व पुरावे तपास यंत्रणांना देण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री म्हणाले, “अजित पवार हे आपल्या महाराष्ट्राचे लाडके व वरिष्ठ नेते होते. त्यांच्या […]
मुंबई महापौरपदी रितू तावडे, उपमहापौरपदी संजय घाडी; बिनविरोध निवडणूक !

मुंबई: वृत्तसंस्था मुंबई महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुकीची आज औपचारिकता पार पडली. भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका रितू राजेश तावडे यांची महापौरपदी, तर सत्ताधारी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक संजय घाडी यांची उपमहापौरपदी नियुक्ती झाली. महापालिकेचे प्रशासक भूषण गगराणी यांनी दोघांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महापालिकेत विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध […]
जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जळगाव : प्रतिनिधी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या ६३ व्या जन्मदिनाच्या औचित्याने, जैन इरिगेशनने संशोधित व विकसित केलेल्या ‘जैन मॅडरिन-१’ या नवीन संत्रा वाणाचे लोकार्पण अशोक जैन व सौ. ज्योती जैन यांच्या हस्ते जैन हिल्स येथील केळीच्या बनात करण्यात आले. या सोहळ्याला जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा वारसा भक्कमपणे पुढे नेणाऱ्या जैन […]
खोट्या कंटेंटवर आता ‘सुपरफास्ट’ कारवाई; ३ तासांची अंतिम मुदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था डिजिटल विश्वातील सुरक्षितता, पारदर्शकता आणि जबाबदारी वाढवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने ‘माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१’मध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा अधिसूचित केल्या आहेत. नव्या नियमांनुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरून तयार केलेल्या वास्तववादी (Photorealistic) फोटो व व्हिडिओंवर स्पष्टपणे ‘AI-जनरेटेड’ असे लेबल लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे नियम २० फेब्रुवारी २०२६ पासून लागू होणार आहेत. नियमांनुसार, […]
आईला शिवीगाळ; समजावणाऱ्या भावाच्या डोक्यात लोखंडी पाईप

जळगाव : प्रतिनिधी पंढरपूर नगर येथे पैशांच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाने आपल्या भावाच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दि. २ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर नगर येथे मयुर चंद्रकांत गुरव (वय २१) हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो. […]
पंधरा दिवसावर मुलीचे लग्न ; वडिलांचा टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी पत्नी नातेवाईकांकडे लग्नासाठी गेलेली होती, तर मुले बाहेर गेलेली होती. त्यामुळे घरात कोणीही नसतांना सुकलाल नारायण गोपाळ (वय ४५, रा. समता नगर) यांनी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. येत्या पंधरा ते वीस दिवसांवर मुलीचा लग्न सोहळा होता, त्यापुर्वीच वडीलांनी टोकाचा निर्णय घेतल्यामुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. […]