September 21, 2026 11:33 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » आईला शिवीगाळ; समजावणाऱ्या भावाच्या डोक्यात लोखंडी पाईप

आईला शिवीगाळ; समजावणाऱ्या भावाच्या डोक्यात लोखंडी पाईप

जळगाव : प्रतिनिधी

पंढरपूर नगर येथे पैशांच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाने आपल्या भावाच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना दि. २ रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर नगर येथे मयुर चंद्रकांत गुरव (वय २१) हा तरुण आपल्या कुटुंबासोबत राहतो. दि. २ रोजी तो घरी आला असता त्याने आईकडे पैशांची मागणी केली. आईने पैसे नसल्याचे सांगितल्याने त्याला राग आला आणि त्याने आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान, वडील त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असताना संशयित शंतनू चंद्रकांत गुरव (रा. अयोध्यानगर) याने हातातील लोखंडी पाईप मयुरच्या डोक्यात मारला. या हल्ल्यात मयुर गंभीर जखमी झाला. तसेच आई-वडिलांनाही शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर मयुर गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित शंतनू गुरव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!