September 20, 2026 4:28 pm

क्रीडाप्रेमींसाठी दिलासादायक निर्णय : अटींसह सागर पार्क मैदान क्रिकेटसाठी खुले राहणार

पब्लिक लाईव्ह न्यूज | जळगाव प्रतिनिधी जळगाव शहरातील क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. महापालिकेच्या सागर पार्क मैदानावर क्रिकेट खेळासाठी बंदी घालण्याच्या प्रस्तावावर अखेर तोडगा निघाला असून, काही अटी आणि नियमांसह मैदान क्रिकेट लीग व खेळासाठी उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. महापालिकेच्या आगामी महासभेत सागर पार्क मैदान खेळासाठी आरक्षित न ठेवण्याचा विषय चर्चेसाठी ठेवण्यात […]

सागर पार्क मैदान क्रिकेटसाठी कायम खुले ठेवा; महासभेतील बंदीचा ठराव रद्द करण्याची मागणी

जळगाव : मनपाच्या मालकीच्या सागर पार्क मैदानावर आयोजित करण्यात येणाऱ्या क्रिकेट स्पर्धांना बंदी घालण्याचा प्रस्ताव आगामी १४ मे रोजी होणाऱ्या मनपा महासभेत मांडण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर शहरातील क्रिकेट प्रेमी, खेळाडू व विविध सामाजिक घटकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर बंदीचा ठराव रद्द करून पूर्वीप्रमाणे अटी-शर्तींसह क्रिकेट स्पर्धांना परवानगी कायम ठेवावी, अशी मागणी […]

जळगावमध्ये बांगलादेशी महिलेसह आश्रय देणाऱ्यावर कारवाई; शनिपेठ पोलिसांची धडक मोहीम

जळगाव | ११ मे २०२६ जळगाव शहरात अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात सुरू असलेल्या विशेष शोध मोहिमेदरम्यान शनिपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. विनापरवाना भारतात प्रवेश करून वास्तव्यास असलेल्या एका बांगलादेशी महिलेला ताब्यात घेत असून तिला आश्रय देणाऱ्या व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार शहरात सुरू असलेल्या “विशेष शोध मोहिमे” अंतर्गत ही […]

PWD लाचकांडात नवे धागेदोरे; नगरसेविकेच्या मुलासह ‘त्या’ वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही होणार चौकशी?

जळगाव : सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, एसीबीने सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमधून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली असून, एका नगरसेविकेच्या मुलाचा तसेच “वरिष्ठ अधिकाऱ्यांचा” संदर्भ आल्याने तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपीने स्वतःसाठी […]

error: Content is protected !!