जळगावचा राजकीय सस्पेन्स संपला! रेश्मा काळे यांची माघार; महाजनांना जाहीर पाठिंबा
जळगाव | प्रतिनिधी : जळगाव विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या रेश्मा कुंदन काळे यांनी निवडणुकीतून माघार घेत भाजप व महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे जळगावमधील निवडणुकीचे संपूर्ण राजकीय समीकरण बदलल्याचे मानले जात आहे. विधानपरिषद…