जळगावात पल्स पोलिओ मोहिमेची उत्साहात सुरुवात; आमदार राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे उपस्थित

जळगाव | प्रतिनिधी : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान २०२६ अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेच्या दवाखाना विभागातर्फे रविवारी (२८ जून) शहरात पल्स पोलिओ मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. धन्वंतरी देवतेचे पूजन करून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी आमदार राजूमामा भोळे व महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते लहान बालकांना पोलिओ डोस पाजून अभियानाची सुरुवात करण्यात आली. यावेळी […]
चार हजार वारकऱ्यांना विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना; पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले –”वारी हीच माझी सर्वात मोठी पुण्याई”

पाळधी / जळगाव, दि. २७ (प्रतिनिधी) : आषाढी एकादशीनिमित्त जळगाव ग्रामीण मतदारसंघातील चार हजारांहून अधिक वारकरी बंधू-भगिनींना विशेष रेल्वेद्वारे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी रवाना करण्याचा भव्य सोहळा रविवारी उत्साहात पार पडला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात भक्ती, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन घडले. यावेळी बोलताना पालकमंत्री […]