September 21, 2026 11:26 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » तरुणाच्या डोक्यावर धारदार वस्तूने वार ; गुन्हा दाखल !

तरुणाच्या डोक्यावर धारदार वस्तूने वार ; गुन्हा दाखल !

जळगाव  : प्रतिनिधी 

दुचाकीच्या खाली ओढून तरुणाच्या डोक्यावर धारदार वस्तूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. २८ रोजी दुपारच्या सुमारास मेहरुण परिसरात घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मेहरुण परिसरात तरुणीचा विनयभंग केल्याच्या कारणावरुन संशयितांनी एका तरुणाला दुचाकीच्या खाली ओढून त्याला मारहाण केली त्यानंतर धारदार वस्तूने तरुणाच्या डोक्यात वार करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी वृद्धाने दिलेल्या तक्रारीवरुन संशयित तेजस प्रभाकर महाजन, निरज अनिल पाटील, हितेश राजेंद्र पाटील, महेश सुपडू महाजन, हेमंत गोविंद महाजन, ललित भागवत धांडे (सर्व रा. भवानी मंदिर पाटीलवाडा, मेहरुण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक अशोक काळे हे करीत आहे

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!