जळगाव | दि. २८(प्रतिनिधी) राज्य शासनाच्या “सेवाकर्मी प्लस” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना विशेष पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मंत्री आशिष शेलार, तसेच पोलिस महासंचालक सदानंद दाते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या सन्मानावेळी मिनल करनवाल यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा परिषदेमार्फत शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शक प्रशासन आणि नागरिकाभिमुख सेवा वितरणात उल्लेखनीय कामगिरी करण्यात आली आहे.
या पुरस्कारामुळे जळगाव जिल्ह्याच्या प्रशासनाला राज्यस्तरावर मान्यता मिळाली असून, जिल्हा परिषदेमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. भविष्यातही अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख सेवा देण्यासाठी या सन्मानामुळे प्रेरणा मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


