September 26, 2026 11:44 am

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » महाराष्ट्र » प्रजासत्ताक दिन चिरायू होवो…विठ्ठल मंदिरात तिरंगी उपरण्याचा साज !

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो…विठ्ठल मंदिरात तिरंगी उपरण्याचा साज !

पंढरपूर : वृत्तसंस्था

देशभरात प्रजासत्ताक दिन अपूर्व उत्‍साहात साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विट्ठल-रखुमाईच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने संपूर्ण मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात आली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मातेला पारंपरिक वस्त्रांचा व दागिन्यांचा साज घालण्यात आला असून गळ्यात तिरंगी उपरणे घालण्यात आले आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक व नयन रम्य अशी तिरंगा ध्वजाप्रमाणे फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये करण्यात आलेल्या सजावटीमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचा समावेश आहे. मंदिरामध्ये विठ्ठल मूर्तीसोबतच रुखूमाई गाभाऱ्यात उपरणे घालून सजावट करण्यात आली आहे.

श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्रींचा गाभारा व नामदेव पायरी येथे झेंडू, शेवंती, कामिनी आदी फुलांची सजावट करण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये करण्यात आलेल्या सजावटीमध्ये 1 टन फुलांचा समावेश आहे. ही सजावट 15 कामगारांनी केली आहे. श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल सभा मंडप, मंदिरातील आतील व बाहेरील बाजूस, श्री संत नामदेव पायरी या ठिकाणी तिरंग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!