पब्लिक लाईव्ह न्यूज | जळगाव २१ एप्रिल राज्य सरकारच्या गृह विभागाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करत जळगाव जिल्ह्यात महत्त्वाचा प्रशासकीय फेरबदल केला आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक Dr. Maheshwar Reddy यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती CID Pune येथे करण्यात आली आहे.
त्यांच्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक Shrikant Dhivare यांची जळगावच्या नव्या पोलीस अधीक्षक (SP) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ढिवरे हे अनुभवी व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

डॉ. रेड्डी यांनी आपल्या कार्यकाळात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबवल्या. संघटित गुन्हेगारीवर अंकुश, पोलिस यंत्रणेची कार्यक्षमता वाढवणे आणि जनतेशी संवाद वाढवणे या बाबींमध्ये त्यांनी ठोस कामगिरी बजावली.त्यामुळे त्यांची कारकीर्द विशेष ठरली.
दरम्यान, राज्यभरात इतरही काही महत्त्वाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
निखिल पिंगळे – पुणे ते सातारा (SP)
राजकुमार शिंदे – पुणे ते वाशीम (SP)
तुषार दोशी – सातारा ते सांगली (SP)
संदीप घुगे – सांगली ते राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
योगेश गुप्ता – कोल्हापूर ते गडचिरोली (DIG)
नीलोत्पल – गडचिरोली ते कोल्हापूर (SP)
एम. रमेश – गडचिरोली (SP)
नवीन एसपी म्हणून श्रीकांत ढिवरे यांच्यासमोर जळगाव जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक मजबूत करणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांचा विश्वास वाढवणे ही मोठी जबाबदारी असणार आहे.
“जळगावमध्ये नवे नेतृत्व… गुन्हेगारीवर आणखी कडक कारवाई होणार का? नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या!”
Author: K P Chavan
thepubliclive


