जळगाव : प्रतिनिधी
खुनाच्या गुन्ह्यातील संशयितांना न्यायालयात आणल्यानंतर तरुणांनी गर्दी करीत गोंधळ घातला. तसेच संशयितांनाही पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक देण्यात आली असून संबंधितांवर कारवाई करावी अशी तक्रार मयताच्या नातेवाईकांनी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील हॉटेल भानूमध्ये किशोर अशोक सोनवणे (वय ३४) याचा दि २२ मे २०२४ रोजी खून झाला होता. या प्रकरणी अटक असलेल्यांना दि. २३ जानेवारी रोजी न्यायालयात आणले. यावेळी न्यायालयाच्या आवारात तरुणांची मोठी गर्दी झाली होती. या गुन्ह्यातील मुख्य संशयित नीलेश सपकाळे याने मोबाईलवर बोलणे केले. तसे व्हिडिओ करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. तसेच न्यायालयाच्या आवारात आलेल्या तरुणांनी संशयितांसोबत सेल्फी काढून ते स्टेटसवर ठेवले. संशयितांना नाशिक कारागृहातून जळगाव न्यायालयात येत असतांना संशयितांनी खासगी वाहनाने प्रवास केला. त्याच्या समर्थकांनी त्याचा व्हीडीओ काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
तसेच एकाही संशयिताला बेड्या नव्हत्या व पोलिसांकडून व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. न्यायालयात सुनावणी सुरु असतांना संशयिताच्या समर्थकांकडून गोंधळ घालून घोषणाबाजी करण्यात आली. हा संपुर्ण प्रकार न्यायालयाच्या आवारातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. हा संपुर्ण प्रकार पोलिसांच्या पाठबळाने सुरु होता, त्यामुळे संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे



