Home » राष्ट्रीय » कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी !

कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जगभरातील भाविक देशातील प्रयागराज येथे होत असलेल्या कुंभमेळ्यासाठी मोठी गर्दी करीत असतांना नुकतेच आता कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी दक्षता घ्यावी. तसेच आवश्यक भासल्यास नियंत्रण कक्षाच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वाशीम जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे कुंभमेळा २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी जात आहेत. आपत्कालीन स्थितीत प्रयागराज येथील कंट्रोल रुम दुरध्वनी क्रमांक ०५२२-२२३७५१५ आहे. तसेच मंत्रालय नियंत्रण कक्ष, मुंबई क्रमांक ०२२-२२०२७९९० तसेच नियंत्रण कक्ष, विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती दूरध्वनी क्रमांक ०७२१-२६६१३६४ आणि जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम दूरध्वनी क्रमांक ०७५२-२३४२३८ आहे. प्रयागराज येथे दर्शनासाठी गेलेल्या नागरीकांनी आवश्यकता भासल्यास सदर क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *