मुक्ताईनगर : प्रतिनिधी
मुक्ताईनगर शहरात वाढत्या चोरीच्या घटना, गुन्हेगारी, तसेच महाविद्यालयीन तरुणींच्या छेडछाडीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रोड रोमियोंचा धुमाकूळही वाढला असून, यामुळे सामाजिक शांतता भंग होत आहे.

या घटनांवर आळा बसावा आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना व्हाव्यात यासाठी भारतीय जनता पार्टी, मुक्ताईनगरच्या वतीने नगरपंचायत मुख्याधिकारी व मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. शहरातील प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी माजी नगराध्यक्षा नजमाताई तडवी, नगरसेवक ललित महाजन, भाजपा शहराध्यक्ष पंकज कोळी, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्षा कविता वाघ, दत्ता जोगी, विजय कठोके आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



