Home » जळगाव » भुसावळ » मजुरास बसची जबर धडक : उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू

मजुरास बसची जबर धडक : उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू

भुसावळ : प्रतिनिधी

तालुक्यातील मुक्ताईनगरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या बसने पायी चालणाऱ्या मजुरास मागील भागाची जबर धडक बसल्याने ५० वर्षीय प्रौढ मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना ३१ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास बोहर्डी महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर घडली होती. रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यार जखमीवर जळगाव सिव्हील रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर शहराकडून भुसावळकडे जाणारी एस.टी. बस (एम- २०, बीएल- ०७२०) ही घेऊन चालक दिलीप जीवराम नागरुत (वय ५५, रा. मेसांगे, ता. मुक्ताईननगर) हे महामर्गावरुन सर्विस रोडकडे वळण घेत होते. याचवेळी रस्ता ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या अनिल अंबोरे यांना एस.टी. बसच्या मागील भागाची जबर धडक बसली. ही घटना ३१ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातात नागरुत हे गंभीर जखमी झाले होते.

या घटनेनंतर त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार घेत असतांना रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान दिलीप नागरुत यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा तपास यासिन पिंजारी करत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *