Home » जळगाव » दुचाकीचालकांनो सावधान : उद्यापासून जिल्ह्यातील रस्त्यावर बसू शकतो १ हजारांचा दंड !

दुचाकीचालकांनो सावधान : उद्यापासून जिल्ह्यातील रस्त्यावर बसू शकतो १ हजारांचा दंड !

जळगाव : प्रतिनिधी

महामार्गावर दुचाकी अपघातात मृत्यू रोखण्यासाठी सोमवार दि. ३ फेब्रुवारीपासून राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. दुचाकी चालक व मागे बसणारा अशा दोघांना ही सक्ती असून चार वर्षांवरील प्रत्येकाने महामार्गावर हेल्मेट परिधान करणे बंधनकारक राहणार आहे. हेल्मेट नसल्यास जागेवरच एक हजार रुपये दंड केला जाणार आहे.

शासनाने राष्ट्रीय महामार्गावर यंदा नवीन वर्षात दि. १ जानेवारी पासून हेल्मेट सक्ती करण्याविषयी आदेश काढण्यात आले. यामध्ये दुचाकीस्वारांना सवय लागणार यासाठी महिनाभर कडक कारवाईची भूमिका पोलिसांनी घेतली नव्हती. मात्र आता महामार्गावर दुचाकी चालक व मागे बसणारा अशा दोघांनाही हेल्मेट सक्ती राहणार आहे. याचे उल्लंघन झाल्यास एक हजार रुपये केला जाणार आहे. यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक पोलिस तैनात राहणार असून ते थेट दंडात्मक कारवाई करणार आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दिली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *