Home » जळगाव » चाळीसगाव » रानडुकराच्या हल्ल्यात तरुणाचा दुर्देवी मृत्यू

रानडुकराच्या हल्ल्यात तरुणाचा दुर्देवी मृत्यू

चाळीसगाव : प्रतिनिधी

पिलखोड शिवारात अलवाडी येथील युवक शेतात गेला होता. दरम्यान रानडुकराच्या हल्ल्या केला. यात त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, अलवाडी येथील सुनील साहेबराव अहिरे (वय २७) हा रविवारी सकाळी ७ वाजता शेतात गेला. सकाळी ११ वाजेनंतरही तो न परत आल्याने त्याचा शोध घेतला. शेतात मृत अवस्थेत तो आढळून आला. दरम्यान वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव जावून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला त्याच्या मांडीवर शिंगांनी केलेल्या जखमा आढळून आल्या. रानडुकराच्या हल्ल्यात तो ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंदार करंबेळकर यांनी व्यक्त केला.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *