Home » जळगाव » महाराष्ट्र एक्सप्रेसमधून १२ लाखांचे दागिने लंपास

महाराष्ट्र एक्सप्रेसमधून १२ लाखांचे दागिने लंपास

जळगाव  : प्रतिनिधी

पुणे येथील नातेवाईकांकडे असलेला कार्यक्रम आटोपून बडनेरा येथे परतणाऱ्या संध्या चंद्रकांत राठी (वय ६९, रा. अमरावती) यांच्या पर्समधून १० हजारांच्या रोकडसह ११ लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्याने चोरुन नेले. ही घटना दि. १ जानेवारी रोजी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये घडली. या प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, अमरावती येथील संध्या राठी यांच्या नातेवाईकांकडे पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे त्यांच्यासह त्यांचे पती डॉ. चंद्रकांत राठी व अन्य दोन नातेवाईक गेले होते. कार्यक्रम आटोपून ते दि. ३१ जानेवारी रोजी रात्री महाराष्ट्र एक्सप्रेसने बडनेरापर्यंत येण्यास निघाले. प्रवासामध्ये संध्या राठी यांनी सोबत आणलेली ३ व दुसरी २ तोळ्याच्या अशा सोन्याच्या दोन चैन, डायमंड मंगळसूत्र, कानातील ८ तोळ्याचे झुमके, ५ ग्रॅमचे टॉप्स व रोख १० हजार रुपये एका बॉक्समध्ये ठेवून ते पर्समध्ये ठेवले. रात्री झोपल्या त्या वेळी त्यांनी ही पर्स बर्थवर स्वतःजवळच ठेवली. सकाळी सात वाजेच्या सुमारास पाचोरा स्थानकापूर्वी त्यांनी पर्स पाहिली असता त्यात रोकड व दागिने दिसून आले नाही.  त्या वेळी त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, मात्र ऐवज न सापडल्याने त्यांनी रेल्वेच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविली. त्या वेळी तसा संदेश रेल्वे नियंत्रण कक्षातून लोहमार्ग पोलिसांना मिळताच जळगाव स्थानकावरील रेल्वे पोलिस चौकीचे पोहेकॉ सचिन भावसार यांनी जळगाव स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेस आल्यानंतर तक्रार नोंदवून घेतली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *