मुक्ताईनगर : ज्ञानेश्वर सावळे
मुक्ताईनगर येथे संत तुकाराम महाराज जयंतीचे औचित्य साधून शिवरायनगर प्रभाग क्रमांक 12, एस.एम. कॉलेजच्या मागे संत तुकाराम महाराज सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रविवार, 2 फेब्रुवारी 2025 रोजी पार पडले.

कार्यक्रमास संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख रवींद्र हरणे महाराज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या सभागृहाच्या ठिकाणी संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था स्थापन होणार असून, त्यासाठी सुरुवातीला मंजूर 50 लाख रुपयांच्या निधीत वाढ करून 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा आमदार पाटील यांनी केली. वारकरी संप्रदायाबद्दल दाखवलेल्या सहिष्णुतेबद्दल वारकरी संप्रदाय व भाविकांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवर: शिवसेना: उपजिल्हाप्रमुख छोटू भोई, तालुकाप्रमुख नवनीत पाटील, शहरप्रमुख प्रशांत टोंगे भाजपा: तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जवरे संत मुक्ताई मंदिर व्यवस्थापक: ह.भ.प. सर्जराव महाराज दीपक वाघ वारकरी संप्रदाय: ह.भ.प. उद्धव जुनारे, ह.भ.प. समाधान महाराज पाटील, ह.भ.प. शिवदास महाराज प्रिंप्राळा, ह.भ.प. गजानन महाराज कोल्हे, ह.भ.प. लखन महाराज पाटील, ह.भ.प. दिनेश महाराज पाटील आदी. स्थानिक नागरिक व कार्यकर्ते: नगरसेवक संतोष कोळी, संतोष मराठे, कीर्तनकार दुर्गा मराठे, प्रवचनकार राजकन्या जोगी, तसेच असंख्य कीर्तनकार, टाळकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गड्डम सर यांनी केले, तर आभार छबिलदास पाटील यांनी मानले.



