Home » राष्ट्रीय » न्यायालयाचा निर्णय अन मंत्री मुंडेंच्या अडचणी वाढल्या !

न्यायालयाचा निर्णय अन मंत्री मुंडेंच्या अडचणी वाढल्या !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून वाल्मिक कराड यांच्यामुळे अडचणीत असलेले मंत्री मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. मंत्री मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात आज (दि.६) दोषी ठरवले. त्यांच्यावरील घरगुती हिंसाचार केल्याचा आरोप कोर्टाने मान्य करून करूणा मुंडे हीच त्यांची पहिली बायको असल्याचे मान्य केले आहे. करूणा यांना दरमहा २ लाख पोटगी देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

करुणा धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत. त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा. कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये, असे निर्देश आणि १ लाख २५,००० रुपयांचा मासिक खर्च देण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *