जळगाव : प्रतिनिधी
शहरातील तीन मजली इमारतीत बसविण्यात आलेल्या लिफ्टचे टेस्टींग करत असतांना वायर रोप तुटल्याने झालेल्या अपघातात एक व्यक्ती जखमी होवून उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नवीपेठ येथील येथे ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. राजकुमार प्रकाश दर्डा वय ४६, रा. मोहाडी रोड, जळगाव असे मयत झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मोहाडी रोड परिसरात राजकुमार दर्डा हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होता. सायकलचा व्यावसाय करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांचे नवीपेठ येथे तीन मजली इमारतीत लिफ्ट बसविण्याचे काम सुरू होते. लिप्टचे काम पुर्ण झाल्यानंतर लिफ्ट कर्मचारी आणि राजकुमार दर्डा हे ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता लिफ्टचे टेस्टिंग करत होते. त्यावेळी अचानक लिफ्टमधील रोपवायर अचानक तुटल्याने लिप्ट कोसळली. त्यात राजकुमार दर्डा हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल केले असता रात्री १२ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोबत असलेला कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.



