रावेर : प्रतिनिधी
तालुक्यातील निंभोरा बु. येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक हुना वारके यांचे ज्येष्ठ सुपुत्र कपिल अशोक वारके (वय ३०) हे दि. ७ मार्च रोजी अपघातात जागीच ठार झाले.

वाघोदा कडून निंभोरा कडे दि. ७ मार्च रोजी संध्याकाळच्या दरम्यान मयत कपील वारके आपल्या वाहनाने येत असताना त्यांच्या मोटरसायकलला कुण्यातरी अज्ञात वाहनधारकाने जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून. मयत कपिल वारके यांच्या मृतदेहचे शवविच्छेदन रावेर येथे करण्यात आले. यानंतर दि. ८ मार्च शनिवार रोजी सकाळी १० वाजता शोकाकुल वातावरणात निंभोरा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार मागे असून ते मनमिळाऊ स्वभावाचे सामाजिक युवा कार्यकर्ते होते. त्याचबरोबर त्यांचा मेडिकलस्टोर्स चा व्यवसाय आहे. अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने निंभोरा सह परिसरात सर्वत्र शोककळा पसरली आहे.



