जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात रस्त्यावरील पाणी वाहत असल्याच्या कारणावरून एकाला शिवीगाळ व मारहाण केली तर एकाच लोखंडी पेन्चिस डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. ही घटना सोमवार दि. १७ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिवाजी नगर हुडको परिसरात राहणारे बाबुलाल खान गुलाब खान (वय ४५) हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवार दि. १७ मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोरून पाणी वाहत असल्याच्या कारणावरून त्यांच्या गल्लीत राहणारे जाकीर, बाबु, रूकय्या, त्यांची दोन्ही मुले आणि त्यांची बहिण शहनाज या सर्वांनी बाबुलाल खान यांना शिवीगाळ करत मारहाण केली तर यातील जाकीर याने हातात लोखंडी पेन्चिस पकडून त्यांच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. याप्रकरणी बाबुलाल खान यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



