Home » जळगाव » माजी उपसरपंचाच्या खुनाने जळगाव हादरले !

माजी उपसरपंचाच्या खुनाने जळगाव हादरले !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील कानसवाडा गावात किरकोळ वादातून ३६ वर्षीय माजी उपसरपंचाच्या छातीत धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून झाल्याची घटना घडली आहे. युवराज सोपान कोळी (वय ३५ रा. कानसवाडा ता. जळगाव) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. डी वाय एस पी कृष्णांत पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपीच्या शोधात पथके रवाना झालेली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, युवराज सोपान कोळी हा तरुण आपल्या आई वडील, तीन मुलं, पत्नी यांच्यासह भांडली येथे वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होते. युवराज कोळी याचे गुरुवारी रात्री एका हॉटेल वर काहीं व्यक्ती सोबत वाद झाले होते. या वादातून अज्ञात तीन जणांनी शुक्रवारी (दि.21) रोजी सकाळी ८ वाजता चाकू आणि चॉपरने वार करून खून करण्यात आला.

ही घटना काही शेतकऱ्यांच्या समोर घडल्याने त्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली, मात्र तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते. युवराज कोळी यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून तरुणास मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड गर्दी करत आक्रोश केला. मयत हे शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *