Home » ताज्या » सुकी नदी पात्रात तरुणाचा आढळून आला मृतदेह !

सुकी नदी पात्रात तरुणाचा आढळून आला मृतदेह !

रावेर  : प्रतिनिधी

तालुक्यातील पाल येथील सुकी नदी पात्रात मध्य प्रदेशातील मूळ रहिवासी असलेल्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, पाल येथील वन प्रशिक्षण केंद्राच्या खाली सुकी नदी पात्रात पाल गावाकडे जाणाऱ्या कच्चा रोडच्या बाजूला सुरेश सुमऱ्या बारेला (वय २५) या तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा तरुण मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील कसोटी येथील मूळ रहिवासी आहे. मात्र, सध्या तो कामानिमित्त एरंडोल तालुक्यातील दापुर येथे वास्तव्याला होता. या तरुणाचा मृत्यू २५ मार्चला दुपारी १२ ते २६ मार्चच्या सकाळी १० वाजेदरम्यान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत चिंपी सुरेश बारेला यांनी दिलेल्या माहितीवरुन रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, सुरेश बारेलाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक तुषार पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेर ग्रामीण रुग्णालयात पाठवला. डॉ. वैभव गिरी यांनी शवविच्छेदन केले असून हा अहवाल आल्यानंतर सुरेशचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे कारण स्पष्ट होईल.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *