Home » जळगाव » चंदूअण्णा नगरात तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

चंदूअण्णा नगरात तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

जळगाव : प्रतिनिधी

घरी कोणीही नसताना मुकेश अर्जुन पाटील (वय ३५, रा. चंदूअण्णा नगर) यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना बुधवार दि. २६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घरातील सदस्य घरी आल्यानंतर उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील चंदूआण्णा नगरात मुकेश पाटील हा तरुण वास्तव्यास होता. संगणक केंद्राचा व्यवसाय करुन तो कुटुंबाला हातभार लावित होता. बुधवार दि. २६ मार्च रोजी दुपारी मुकेश घरी एकटाच असतांना त्याने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. काही वेळाने कुटुंबीय घरी आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. मुकेश यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.

आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नसले तरी गेल्या काही दिवसांपासून मुकेश हे आर्थिक विवंचनेत होते. त्याकरिता काही नातेवाईक त्यांची समजूतदेखील काढत होते, अशी माहिती कुटुंबीयांकडून मिळाली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *