Home » राष्ट्रीय » देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट : आरोपींनी दिली मोठी कबुली !

देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट : आरोपींनी दिली मोठी कबुली !

मुंबई : वृत्तसंस्था

बीड जिल्ह्याती संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुले याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. घुले याच्यासह इतर तीन आरोपींनी देखील हत्येची कबुली दिल्याची माहिती आहे. वाल्मिक कराड यांनी सांगितल्यानंतर खंडणी मागण्यात आल्याची माहिती या आरोपींनी दिली.

दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणी 3 आरोपींनी कबुली जवाब दिल्याने आता वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. आरोपी सुदर्शन घुलेसह तीन आरोपींनी गुन्हा कबुल केला आहे. या तिन्ही आरोपींनी दिलेली कबुली खूप महत्त्वाची मानली जात आहे. कारण आता यावरच केस आणखी मजबूत होणार आहे.आरोपींपैकी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलिस चौकशीत आपला गुन्हा कबुल केला आहे. आपणच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची हत्या केल्याची कबुली सुदर्शन घुलेसह तीन आरोपींनी दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

पोलिसांनी सुदर्शन घुले याला आवादा कंपनीमधील धमकी देत असतानाचा व्हिडिओ दाखवत प्रश्न विचारण्यास सुरवात केली. यावेळी होय आम्हीच अपहरण केले आणि आम्हीच हत्या केली अशी कबुली घुलेने दिली. अवादा कंपनी परिसरात देशमुख आणि ग्रामस्थांनी मिळून वाढदिवस असतानाच आम्हाला मारहाण केली तसेच त्याचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा राग मनात होता आणि म्हणून हत्या केल्याची कबुली घुलेने दिली आहे. सरपंच संतोष देशमुख ‎यांच्या हत्येप्रकरणी बुधवारी सुनावणी झाली. ‎सरकारी उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद ‎केला. संपूर्ण घटनेला वाल्मीक कराड याने ‎गाइड केल्याचे सीडीआरमधून समोर ‎आल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. ‎सरपंच संतोष देशमुख यांचा खून एका मोठ्या ‎कटाचा भाग आहे. त्यात वाल्मीक गाइड होता, ‎तर सुदर्शन घुले गँगलीडर होता, असे ‎ॲड.निकम यांनी न्यायालयाला सांगितले. ‎‎

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *