Home » जळगाव » रामानंदनगर परिसरात २३ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

रामानंदनगर परिसरात २३ वर्षीय तरुणाने संपविले आयुष्य !

जळगाव : प्रतिनिधी

रामानंदनगर परिसरात राहणाऱ्या कुणाल अनिल महाजन (वय २३) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंदनगर परिसरात कुणाल महाजन हा आई वडील व मोठ्या भावासह वास्तव्यास होता. रस्त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून तो कामाला होता. बुधवारी रात्री कुणाल घराच्या मागच्या खोलीत गेला. तेथे गळफास घेवून त्याने जीवनयात्रा संपविली.

आईने दरवाजा दोन ते तीन वेळेस ठोठावला पण, कुलर सुरू असल्यामुळे मुलगा गाढ झोपेत असेल म्हणून आईनेही पुन्हा दरवाजा ठोठावला नाही. अखेर रात्री १०.३० वाजता वडिल व मोठ्या भावाने पुन्हा दरवाजा ठोठावल्यावर आतून कुठलाही आवाज आला नाही, म्हणून दरवाज्याला धक्का देत दरवाजा उघडल्यावर त्यांना कुणाल गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलाचा मृतदेह पाहुन कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविल्यानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजता शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. याप्रकरणी अधिक तपास रामानंदनगर पोलिस करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *