Home » राष्ट्रीय » स्वारगेट बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासे !

स्वारगेट बलात्कार प्रकरणात धक्कादायक खुलासे !

पुणे : वृत्तसंस्था

पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये २६ फेब्रुवारी २०२५ रोजी एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात आता नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीने आरोपी दत्तात्रय गाडे याने तिसऱ्यांदा लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संदर्भात तिने राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी नोंदवल्या आहेत.

ही घटना स्वारगेट बस स्थानकात घडली, जिथे फलटणला जाण्यासाठी बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला आरोपीने बंद पडलेल्या शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. तब्बल ७५ तासांच्या शोधानंतर पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडेला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. मात्र, या प्रकरणात पीडितेने पोलिसांच्या वागणुकीवर आणि तपास प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

पीडितेने तिच्या पत्रातून अनेक गंभीर बाबी मांडल्या आहेत: वैद्यकीय तपासणीचा त्रास: “माझी संमती नसताना पुरुष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माझी तपासणी केली. मला त्याचा त्रास झाला,” असे तिने नमूद केले.

“मला अनेक पुरुष पोलिसांना माझ्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती पुन्हा पुन्हा सांगावी लागली, ज्यामुळे माझी मानसिक स्थिती आणखी खराब झाली.आरोपीने दोनदा बलात्कार केल्यानंतर तिसऱ्यांदा पार्श्वभागातून जबरदस्तीचा प्रयत्न केला. मी पूर्ण ताकदीने विरोध केला, तेव्हा तो पळून गेला,” असे तिने लिहिले. “पोलिसांनी मला तीन वकिलांची नावे सुचवून त्यातून एकाची निवड करण्याचे आश्वासन दिले होते. मी असीम सरोदे यांची मागणी केली, पण मला एक दिवस उशीर झाल्याचे सांगून दुसऱ्या वकिलाची नेमणूक केली. माझ्या म्हणण्याला कायदेशीर महत्त्व नाही का?”

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *