Home » जळगाव » फॉर्च्यूनरची नॅक्सॉनला जबर धडक : चार वर्षाचा बालक ठार !

फॉर्च्यूनरची नॅक्सॉनला जबर धडक : चार वर्षाचा बालक ठार !

चाळीसगाव : प्रतिनिधी

चाळीसगावहून धुळ्याकडे जाणाऱ्या टाटा नॅक्सॉन (क्रमांक एम.एच.५२/बी ०९९६) या चारचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या फॉर्च्यूनर (क्रमांक एम.एच. १८/बीएक्स ००११) वाहनाने भोरस गावाजवळ जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात नॅक्सॉन वाहनचालक दिनेश देवराम महाजन यांचा चार वर्षांचा मुलगा देवांश दिनेश महाजन याचा जागीच मृत्यू झाला, तर दिनेश महाजन, त्यांची पत्नी स्वाती महाजन आणि १२ वर्षीय मुलगी आरोही महाजन हे गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातातील फॉर्च्यूनर वाहन हे डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांच्या मालकीची असून, ते स्वतः हे वाहन चालवत होते. अपघातानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहाय्यक निरीक्षक संदीप घुले आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

जखमींना तातडीने उपचारासाठी ट्रॉमा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आले आहे. डॉ. मंदार करंबेळकर यांनी त्यांच्यावर उपचार केले. दरम्यान, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात डॉ. उत्तमराव महाजन यांच्या विरोधात अपघाताची नोंद करण्याचे काम सोमवार (दि.1) रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अपघात डॉ. उत्तम महाजन यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे सांगितले जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *