जळगाव : प्रतिनिधी
प्रेमविवाह केल्याच्या कारणावरुन अरशद खान नईम खान पठाण (वय ३४, रा. उस्मानिया पार्क) यांना सलमान सलीम खान रा. शिवाजी नगर याने लाकडी बॅटने कपाळावर मारुन गंभीर जखमी केले. ही घटना दि. २ रोजी उस्मानिया पार्कमध्ये घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील उस्मानिया पार्क परिसरात अरशद खान नईम खान पठाण हा तरुण वास्तव्यास असून तो चालक म्हणून नोकरी करतात. दि. २ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास प्रेमविवाह केल्याच्या कारणावरुन सलमान सलीम खान याने अरशद खान याने लाकडी बॅटने कपाळावर मारुन दुखापत केली. तसेच शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची देखील धमकी दिली. दरम्यान, अरशद खान याने शहर पोलिसात तक्रार दिल्यावरुन सलमान सलीम खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे



