September 24, 2026 11:53 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » जिल्हा परिषदेत खळबळ : अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

जिल्हा परिषदेत खळबळ : अधिकाऱ्याने घेतली १५ हजारांची लाच !

जळगाव : प्रतिनिधी

जळगाव जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे यास १५ हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले आहे. जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक प्रतिबंधक विभागाने तक्रारीवरून सापळा लावला आणि दुपारी ३.३० ते ४ वाजेच्या सुमारास लाच घेतांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी जिल्हा आरोग्य विभागातील काहींची चौकशी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) एका तक्रारदाराने लाच मागितल्याबाबत तक्रार दिली होती. अति. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने त्याचे शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार जळगाव एसीबीने लाच मागणीची सत्यता पडताळणी केली. त्यानंतर आरोग्य विभागात सापळा लावला. त्यात अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयंवत मोरे यांना तडजोडी अंती १५ हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या कारवाईमुळे सायंकाळी आरोग्य विभागात शुकशुकाट दिसून आला.

दरम्यान या कारवाई नंतर आरोग्य विभागातील काही अधिकारी, अधिनिस्त कर्मचारी यांची चौकशी केली असून त्यांच्याकडून जळगाव एसीबीचे पथक माहिती घेत आहे. तर एसीबीच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथक पुढील कारवाई करीत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!