जळगाव : प्रतिनिधी
जळगाव महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. तब्बल 43 जणांनी तहसीलदारांच्या बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर करून बनावट जन्म-मृत्यू दाखले मिळवल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नायब तहसीलदार नवीनचंद अशोक भावसार यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये 43 जणांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, संपूर्ण शहरात खळबळ माजली आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने एकूण 50 दाखले जारी केले होते. परंतु, काही दिवसांपूर्वी या दाखल्यांच्या सत्यतेबाबत शंका व्यक्त झाल्यानंतर तहसील कार्यालयाने चौकशी सुरू केली. चौकशीत फक्त 7 अर्ज वैध, तर उर्वरित 43 अर्ज बोगस असल्याचे स्पष्ट झाले.

बुशरा खान मोहम्मद इस्लाउद , मोहसिन चांद मोहम्मद, निगार सुलताना हाफिज खान, समीर खान अयुब खान, नसरीन बानो आयुब खान, अफजल खान, आयुब खान, नदीम खान, हाफिज खान, शिरीष बानो फरीक शहा, आरिफ खान इसा खान, खान असदुल्ला खान हाफिज, शहाआरिफ अहमद, समशेर बेग तुराब बेग, तोसिफ शहा जिनाउल्ला शहा, तुराब बेग गुलाब बेग, शहनाज वी शेख मुनीर, वाहेदाबी अब्दुल गणी, अब्दुल्ला अजगर अली सय्यद, नुसरत बानो, जबीउल्ला शहा, शहा अयाज अहमद अब्दुल अजीज, मोहम्मद वसीम जबी मुल्ला शाहा, मोहम्मद, जनीक परविन अमानुउ ल्ला शाहा, बिस्मिल्लाह खान, शेख सलीम शेख बशीर, शेख अनिल शेख बशीर, मोहम्मद अखिल शेख बशीर, मोहम्मद कलीम शेख बशीर, शरीफ नईमोद्दीन, मोहम्मद शकील शेख बशीर, अमरीन रशीद पटेल, जाकीर फकीर मोहम्मद तांबोळी, तबसून परविन मोहम्मद इकबाल, शेख मोहम्मद इकबाल अब्दुल रहीम, राहत नाज जबीउल्ला शाहा, तसलीमा बी शेख यासिम, शोहरत अली शरीफ मुनसारी, शेख शांनदोस शेख इसाक, या सर्वांच्या विरुद्ध नायब तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत असेही नमूद आहे की, यातीलच 11 जन्म-मृत्यू अर्जांची नावे तहसील कार्यालयाच्या आवक रजिस्टरमध्ये नोंदलेली आहेत. मात्र, त्यांनी सादर केलेल्या जन्म मृत्यू नोंदणी आदेशावरील तहसीलदारांची सही बनावट असल्याचे आढळून आले आहे.



