मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून कुणाल कामरा यांच्या कॉमेडीमुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता त्यात स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकमनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत म्हटलं होतं. या प्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी कामराने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली हाेती. या प्रकरणी न्यायालयाने आज (दि.८) मुंबई पोलिस आणि गुन्हा दाखल केलेल्या शिवसेना आमदाराला ‘उत्तर द्या’ नोटीस बाजवली असून, पुढील सुनावणी १६ एप्रिल रोजी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकमनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत म्हटलं होतं. उपमुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ‘गद्दार’ असा उल्लेख केला होता. यारून राज्यात वातावरण चांगलेच तापले होते. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कामराविरोधात गुन्हा दाखल झाला हाेता. कामराने न्यायालयाकडे गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि एस.एम. मोडक यांच्या खंडपीठासमाेर सुनावणी झाली. पोलिस आणि तक्रारदार आमदार पटेल यांना सूचना घेऊन याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. या प्रकरणात पुढील सुनावणी आता बुधवार १६ एप्रिल २०२५ रोजी होणार असल्याचे न्यायालयाने निश्चित केले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक गाण्यावरून कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कामराविराेधात खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हाेता. कामरा याला अनेक वेळा चौकशीसाठी समन्स देखील बजावले होते. त्याने चौकशीसाठी हजर राहणे टाळले. यानंतर त्याने दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर बुधवार १६ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.



