ठाणे : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना सातत्याने उघडकीस येत असतांना आता ठाणे येथे एका 10 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नंतर तिचा गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीने सहाव्या मजल्यावरील त्याच्या फ्लॅटच्या बाथरूमच्या खिडकीतून मृतदेह खाली फेकून दिला. पोलिसांनी 20 वर्षीय आरोपी आसिफ अकबर मन्सूरीला अटक केली आहे.

ठाणे पोलिसांनी सांगितले की, ही घटना सोमवारी रात्री मुंब्रा येथील सम्राट नगर भागात घडली. ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यासीन तडवी म्हणाले की, घटनेची माहिती रात्री 11.48 वाजता मिळाली. ज्या इमारतीत ही घटना घडली ती 10 मजली उंच आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा बिहारमधील बांका जिल्ह्यातील सुलतानपूरचा रहिवासी आहे. तो मुलीला खेळण्याचे आमिष दाखवून सोबत घेऊन गेला. यानंतर, त्याने सहाव्या मजल्यावरील त्याच्या फ्लॅटमध्ये हा गुन्हा केला. पोलिसांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध POCSO, खून, पुरावे नष्ट करणे आणि खोटी माहिती देणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीच्या फ्लॅटची झडती घेण्यात आली. तिथून पुरावे सापडले आहेत. आरोपींनी मृतदेह इमारतीच्या मागच्या नाल्यात फेकून दिला होता. जवळपास राहणाऱ्या लोकांना मोठा आवाज ऐकू आला. यानंतर लोकांनी मृतदेह पाहिला.



