Home » जळगाव » कासोद्याजवळ दुधाच्या टँकरच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

कासोद्याजवळ दुधाच्या टँकरच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

एरंडोल : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना एरंडोलकडून भरधाव वेगात येणाऱ्या दुधाच्या टँकरने पायी फिरायला गेलेल्या प्रौढास मागाहून जबर धडक दिल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ८ एप्रिलला रात्री कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील भावे नगरमधील रहिवासी योगेश चंद्रकांत देशमुख (वय ४८) हे दररोज रात्री जेवणानंतर शतपावलीसाठी रस्त्याच्या कडेने चालत होते. या वेळी मागाहून भरधाव वेगात येणाऱ्या दुधाच्या टँकर (एमएच १७, बीडी ७७२२) ने त्यांना जबर धडक दिली. यात योगेश देशमुख यांच्या डाव्या पायावरुन टँकरचे चाक गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या योगेश देशमुख यांना जळगाव येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर टँकर चालक घटना स्थळावरून थेट टँकरसह कासोदा पोलीस ठाण्यात हजर झाला.

मयत योगेश देशमुख हे दोन बहिणींचे एकुलते एक भाऊ कर्ते होते. त्यांच्या तर घरातील कर्ते पश्चात आई, वडील, पत्नी, ३ मुले असा परिवार आहे. योगेश देशमुख यांच्यावर ९ एप्रिललला दुपारी दीड वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. योगेश हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या अंत्ययात्रेत पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक, मुस्लिम बांधवसह पाळधी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील सहभाजी झाले होते.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *